शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सायको किलरची दहशत पोलीस ठाण्याला घेराव

By admin | Updated: February 4, 2017 02:50 IST

चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा,

संतप्त महिलांची निदर्शने : सक्करदऱ्यात तणाव नागपूर : चाकूहल्ला करून महिला-मुलींमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा, अशी मागणी करीत संतप्त जमावाने शुक्रवारी रात्री सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातला. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. ३० जानेवारीच्या रात्री चंद्रकला ढेंगे (वय ५०, रा. कर्नलबाग) आणि यांच्यावर रेशीमबाग मैदानाजवळ आणि तासाभरानंतर हनुमाननगर त्रिकोणी पार्कजवळ शोभा ठाकूर (वय ५०) या महिलेवर सायको किलरने चाकूने वार करून या दोन्ही महिलांना गंभीर जखमी केले होते. तत्पूर्वी त्याने हुडकेश्वर, अजनी, सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिला-मुलींवर हल्ला करून त्यांना जखमी केले. गुरुवारी सकाळी सिद्धेश्वर शाळेजवळ आणि शुक्रवारी सायंकाळी सक्करदऱ्यात पुन्हा दोन महिलांवर हल्ले केल्याची वार्ता पसरली. यामुळे परिसरातील महिला-पुरुष संतप्त झाले. त्यांनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदरा ठाण्यावर धडक दिली. जोरदार घोषणाबाजी करीत सायको किलरला तातडीने अटक करा, अशी मागणी केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच अनेक वरिष्ठ पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी सायकोला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी ट्रॅप लावण्यात आल्याचेही सांगितले. त्याला लवकरच पकडण्यात येईल, असे आश्वासन देऊन जमावाला शांत केले.(प्रतिनिधी)