शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण होणार

By admin | Updated: August 23, 2015 03:16 IST

राजकीय इच्छाशक्तीमुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला निधीचा तुटवडा जाणवणार नाही, शिवाय प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमानुसारच निर्धारित वेळेत ...

मेट्रो रेल्वेचे एमडी बृजेश दीक्षित यांची माहिती : सध्या कंपनीकडे ६० कोटीनागपूर : राजकीय इच्छाशक्तीमुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला निधीचा तुटवडा जाणवणार नाही, शिवाय प्रकल्प कालबद्ध कार्यक्रमानुसारच निर्धारित वेळेत आणि निधीत पूर्ण होईल, असा विश्वास नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे व्यक्त केला. टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार भवनात शनिवारी आयोजित संवाद कार्यक्रमात दीक्षित बोलत होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संघाचे सचिव अनुपम सोनी व ‘एनएमआरसीएल’चे उपमहाव्यस्थापक डॉ. सुमंत देऊळकर उपस्थित होते. दीक्षित म्हणाले, हा प्रकल्प ८६८० कोटी रुपयांतून उभा होत आहे. ४५०० कोटी रुपये कर्जस्वरूपात राहतील. यात केंद्र, राज्य, मनपा व नासुप्रचा वाटा आहे. सध्या कंपनीकडे ६० कोटी रुपये असून त्यात ३७ कोटी केंद्र, १५ कोटी नासुप्र आणि उर्वरित राज्याचा वाटा आहे. (प्रतिनिधी)१४ मेगावॅट ऊर्जेची निर्मितीप्रकल्पाला लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी दोन तृतीयांश अर्थात १४ मेगावॅट ऊर्जा सोलरद्वारे तर एक तृतीयांश ऊर्जा इतरत्र माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ३६ स्टेशनच्या छताचे बांधकाम सोलर ऊर्जेसाठी पूरक राहील. प्रारंभीपासूनच सोलर ऊर्जेचा वापर करणार हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. सोलरची उपकरणे अद्ययावत आणि आयातीत राहतील, असे दीक्षित म्हणाले.१० कि़मी. सुरक्षा भिंतविमानतळ ते मिहानपर्यंत ५ कि़मी. लांब प्रकल्पात दोन्ही बाजूला ५-५ असे एकूण १० कि़मी. भिंतीचे बांधकाम करून त्यावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ५०० मीटरपर्यंत वाढीव एफएसआय मिळणार आहे. ८५ हेक्टर जागेची गरजकंपनीला जवळपास ८५ हेक्टर जागेची गरज आहे. त्यातच ४० हेक्टर जागा मिळाली असून ३० हेक्टर जागेसाठी प्रशासनाकडून नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. बांधकाम रस्त्याच्या मध्यभागातून होणार आहे. त्यामुळे जास्त जागेच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव नाही. दोन्ही मार्गातील ३६ स्टेशन आणि पार्किंगसाठी जागा हवी आहे. मिहान व हिंगणा येथे कार डेपो (२६ हेक्टर), मॉरिस कॉलेज, टी-पॉर्इंट, मुंजे चौक, पटवर्धन स्कूल आदींसह १०० पेक्षा जास्त कामांसाठी छोट्या छोट्या जागा लागणार आहे.डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणारविमानतळ ते मिहान या दरम्यानचे ८६ कोटी रुपयांचे बांधकाम सुरू झाले आहे. काही कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्यांचे बांधकाम पुढील काही महिन्यांतच सुरू होणार आहे. बांधकामादरम्यान सुरक्षेवर महत्त्वबांधकामादरम्यान नागरिकांना त्रास न होता ठराविक वेळात पूर्ण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. किमान अंतरावर बॅरिकेटस् लावून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस व नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे. सीसीटीव्हीने वाहतुकीवर २४ तास नियंत्रण राहणार आहे. मुंजे चौकाच्या डिझाईनसाठी स्पर्धामुंजे चौकाच्या डिझाईनसाठी स्पर्धा बोलविण्यात आली होती. त्यात जागतिक दर्जाच्या २४ आर्किटेक्ट कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यातील १२ ते १३ जणांची निवड करण्यात येणार आहे. अशा कामांचा अनुभव असलेल्यांकडून या चौकाचे डिझाईन तयार करवून घेण्यात येणार आहे. काम करीत असताना या चौकातील वाहतूक आणि व्यावसायिकांवर काहीही परिणाम होणार नाही. मुंजे चौक ते मिहानपर्यंतच्या कामाच्या निविदा मागविल्या आहेत. २६ आॅगस्टपर्यंत उघडण्यात येणार आहे.