शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची धडक

By admin | Updated: November 28, 2014 01:02 IST

२५ वर्षांचा काळ उलटूनही महाराष्ट्र शासन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी हजारो प्रकल्पग्रस्तांनी

उपजीविकेच्या प्रश्नांकडे वेधले लक्षनागपूर : २५ वर्षांचा काळ उलटूनही महाराष्ट्र शासन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी हजारो प्रकल्पग्रस्तांनी गोसेखुर्द धरणावर ताट-वाटी,पाटी, धुटी व घागरी घेऊन धडक दिली आणि निदर्शने केली. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द गावाजवळ साकारण्यात आलेल्या राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पात शेती घरे बुडाल्याने हजारो कुटुंबे बेघर व बेरोजगार झाली आहेत. शासनाने प्रकल्पावर व पुनर्वसनावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी समस्या कायमच आहेत. नवीन गावठाणातील पुनर्वसन स्थळी उपजीविकेचा प्रश्न आ वासून पुढे आला आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज यासारख्या मूलभूत नागरी सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने संयोजक विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मेंढा गावी एकत्र येऊन दुपारी १ वाजता हजारोंच्या संख्येतील मोर्चाला सुरुवात झाली. पाथरी, भालची, पेंढरी, नवेगाव, मेंढा, सिर्सी, गिरोळा, चिंचखेडा, आंभोरा, जीवनापूर, सौदंड, नेरला, जामगाव, पांजरेपार, गोहली, बोरगाव आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. मोर्चात प्रकल्पग्रस्तांनी ताटी-वाटी-धुटीच्या गजरात घोषणाबाजी केली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना उपजीविकेसाठी प्रशिक्षण, रोजगार, व्यवसाय, नोकरी देण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त कल्याणकारी योजना तयार करावी व त्यासाठी आर्थिक अनुदान विषयक तरतूद करण्यात यावी. मासेमारी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळावा व प्र्रकल्पग्रस्तांसाठी जलाशय आरक्षित करण्यात यावा, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार व वृद्धांना पेन्शन योजना सुरू करावी, आदी मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वातील मोर्चात विठोबा समरित, सरपंच रिना भुरे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, सोमेश्वर भुरे, वामन सेलोकर, लक्ष्मीकांत तागडे, प्रकाश मेश्राम, किशोर समरित, काशिनाथ सहारे, विनोद शेंडे आदींसह हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)