शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘सेवाग्राम’मधील कामांना मिळणार गती

By admin | Updated: June 7, 2017 02:04 IST

सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधांच्या विकासाला आता गती मिळणार आहे.

अपूर्व चंद्रा यांचे निर्देश : १४५ कोटीच्या खर्चास मान्यता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधांच्या विकासाला आता गती मिळणार आहे. सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट असलेली कामे त्वरित सुरू करून जलद पूर्ण करण्यात यावीत, असे राज्याचे नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, मीरा अडारकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी झालेल्या शिखर बैठकीत सेवाग्राम विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार सेवाग्राम परिसरात पायाभूत नागरी सुविधा निर्मितीसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत सेवाग्राम परिसर विकास आराखड्यात समाविष्ट कामांचा तसेच अन्य कामांसाठी १४५ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. यामध्ये सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास व संबंधित कामे, वारसा संवर्धन व नागरी रचनेअंतर्गत कामे, पर्यावरण, पायाभूत सुविधांचा विकास तसेच हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा, धाम नदीकाठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या कामांबाबातची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांची मान्यता या बाबी कालबध्द पध्दतीने पूर्ण कराव्यात तसेच या कामांबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांची बैठक घ्यावी, असे सांगितले. मोठा ताजबाग विकास आराखड्याचे सादरीकरण यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नागपुरातील मोठा ताजबागच्या नियोजित विकास आराखड्याचे सादरीकरण केले. मोठा ताजबाग विकासासाठी १३२ कोटी रुपयांचा निधी नियोजित असून, २४ एकर जागेच्या परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पायाभूत सुविधा व परिसर सौंदर्यीकरण करण्यासाठी आराखडा तयार करून त्याचे संनियंत्रण करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोठा ताजबागच्या विकासकामांच्या पहिल्या टप्प्यात दर्गा कॉम्प्लेक्स, ऊर्स मैदानाची संरक्षण भिंत, पथदिवे, रस्त्यांचे डांबरीकरण, तसेच प्रसाधनगृहांचे काम, मुख्य प्रवेशद्वार, विस्थापितांकरिता शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश असून, त्यासोबतच दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण झाली असल्याचे यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सादरीकरणातून सांगितले.