शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वॉर्डरचनेची प्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ३० सप्टेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. २०११ मधील शहरातील एकूण लोकसंख्येचा विचार करून १५१ वॉर्डाची रचना केली जात आहे. शहराच्या उत्तरेकडून सुरुवात करण्यात आली आहे. याचा शेवट दक्षिणेकडे होईल.

वॉर्ड रचना करताना शहरातील जुन्या भागातील वॉर्डाचे क्षेत्र कमी राहील; परंतु शहरालगतच्या भागात वॉर्डाचे क्षेत्र मोठे राहणार आहे. २०११ च्या लोकसंख्येवर वॉर्ड रचना होत आहे; मात्र मागील १० वर्षात शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात प्रामुख्याने शहरालगतच्या भागाचा समावेश आहे. याचा विचार करता या भागातील वॉर्डात लोकसंख्या कमी व मतदार अधिक असे चित्र राहणार आहे.

...

दोन सदस्यीय झाल्यास पुन्हा वॉर्ड रचना

निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार एक सदस्यीय वॉर्ड रचनेचा आराखडा तयार केला जात आहे; परंतु राज्य सरकारने दोन सदस्यीय वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला तर वॉर्ड रचना पुन्हा करावी लागेल, अशी माहिती मनपातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच यासाठी पुन्हा एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.

....

४० हजार मतदारांची नावे वगळली

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो नसलेल्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. शहरातील जवळपास ४० हजार मतदारांचा यात समावेश आहे. याचा विचार करता मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची शहानिशा करावी. नाव नसल्यास निवडणूक कार्यालयाकडे अर्ज करून आपल्या नावाचा समावेश करणे गरजेचे आहे. मनपाच्या झोन कार्यालयांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत.