शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सची वाढू शकते मनमानी!

By admin | Updated: October 30, 2015 02:54 IST

सुट्यांचा हंगाम आला की रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशी अपूर्णच...

दिवाळीनिमित्त तिकिटांचा दर वाढण्याची शक्यतानागपूर : सुट्यांचा हंगाम आला की रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशी अपूर्णच... यामुळे खासगी बसशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, अशा ऐन हंगामात अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत प्रवाशांना लुटण्याचा प्रकार अनेक ट्रॅव्हल्स कंपन्याकडून सर्रास होतात. या वर्षीही दिवाळी सुट्यांचा फायदा घेण्यासाठी काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या तयारी करीत असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’च्या चमूने गुरुवारी अमरावती रोड, बैद्यनाथ चौक, गणेशपेठ बसस्थानकावरील काही ट्रॅव्हल्सच्या कार्यालयांना भेटी दिल्या असता, दिवाळीलगत असलेल्या दिवसांमध्ये तिकिटांचा दरात दुपटीने वाढ होण्याचे संकेत तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळाले. बैद्यनाथ चौकबैद्यनाथ चौकातील एका मोठ्या ट्रॅव्हल्स कार्यालयात चमू पोहचली. तेथील महिला कर्मचाऱ्याला ८ नोव्हेंबरसाठी नागपूर-इंदोर प्रवासाच्या वातानुकूलित (एसी) स्लीपर तिकीटाचे दर विचारल्यावर आज बुक केल्यावर १२०० दर लागल्याचे सांगून पुढील काही दिवसांत यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता वर्तवली. नॉन एसी बसचे दर ७५० रुपये सांगितले.याच चौकातील दुसऱ्या ट्रॅव्हल्स कार्यालयात चमू गेल्यावर तेथील किशोर नावाच्या कर्मचाऱ्याने नागपूर-नांदेड प्रवासाच्या दिवाळीच्या तीन दिवसांपूर्वीपर्यंतच्या तिकीट एसी बससाठी ७४० तर नॉन एसीसाठी ६३० रुपये दर सांगितले. परंतु हेच दर ८ नोव्हेंबरपर्यंत १००० तर १२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही वर्तवली. (प्रतिनिधी)गणेशपेठ चौकगणेशपेठ चौक येथील एका ट्रॅव्हल्स कार्यालयातील बुकिंग कर्मचाऱ्याने इंदोरसाठी नॉन-एसी बसचे भाडे आजच्या स्थितीत ५०० रुपये सांगितले, परंतु दोन दिवसानंतर यात वाढ होण्याची माहितीही दिली. याच भागातील दुसऱ्या ट्रॅव्हल्स कार्यालयातील कर्मचाऱ्याने नागपूर-पुणे प्रवास भाड्याचे दर ८०० रुपये सांगितले, परंतु ९ नोव्हेंबर तारखेचे बुकिंग मागितल्यावर त्याने नवीन दरपत्रकाचा चार्टच समोर केला.