शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात शासकीय तुलनेत खासगी केंद्र पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी ...

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, सात शासकीय रुग्णालयातील केंद्राच्या तुलनेत खासगी रुग्णालयातील केंद्रावर अधिक प्रमाणात लसीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात आज पुन्हा ५० टक्क्याच्या खाली लसीकरण झाले. कोविशिल्डचे ४९.८८ टक्के तर कोव्हॅक्सिनचे ४९.५० टक्के लसीकरण झाले.

शहरात कोविशिल्डचे २१ तर कोव्हॅक्सिनचे २ केंद्र आहेत. यातील मेडिकलमधील दोन, मेयोमधील दोन, एम्स, डागा, मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल, विमा दवाखाना, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय व पोलीस हॉस्पिटल असे १० केंद्र आहेत. यातील पोलीस हॉस्पिटल सोडल्यास इतर केंद्रावर दिलेल्या लक्ष्यापैकी आज ९ टक्क्यापासून ते ५० टक्क्यापर्यंत लसीकरण झाले. याउलट ११ खासगी केंद्रावर २० ते ८९ टक्क्यापर्यंत लसीकरण झाले. सूत्रानुसार, खासगी केंद्रावर खासगी हॉस्पिटल जुळलेले आहेत. यातच अनेक हॉस्पिटलने हॉस्पिटलशी संबंध नसलेल्या परंतु ओळखीच्या व्यक्तींना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस देत आहे. यामुळे त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

-मेयो व एम्समध्ये ९ टक्केच लसीकरण

कोविशिल्ड लसीकरणासाठी २१ केंद्र मिळून सोमवारी १७०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले होते. यातील ८४८ म्हणजे, ४९.८८ टक्केच लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मेयो व एम्समध्ये केवळ ९ टक्केच लसीकरण झाले. शिवाय, डागामध्ये ४३ टक्के, पीएमएच हॉस्पिटलमध्ये ८५ टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ६६ टक्के, ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ७० टक्के, सीम्स हॉस्पिटलमध्ये २० टक्के, दंदे हॉस्पिटलमध्ये ८९ टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ५९ टक्के, विमा दवाखान्यामध्ये ५० टक्के, भवानी हॉस्पिटलमध्ये ११ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ६२ टक्के, अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये ३९ टक्के, म्यूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २० टक्के, मनपाचा इंदिरा गांधी रुग्णालयात ३४ तर पोलीस हॉस्पिटलमध्ये १४७ टक्के लसीकरण झाले.

-मेडिकलमध्ये ४९ टक्के लसीकरण

मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लसीकरणाचे दोन केंद्र आहेत. आज या दोन्ही केंद्राला मिळून २०० लाभार्थ्यांचे लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ९९ म्हणजे ४९.५० टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. मेडिकलला आतापर्यंत २६०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी १३०३ म्हणजे, ५०.१२ टक्के लसीकरण झाले.