शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

खासगी बस उलटली, चार ठार

By admin | Updated: July 9, 2016 02:55 IST

नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरचा वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला.

१२ जण जखमी : टाकळघाट फाटा परिसरातील अपघातटाकळघाट : नागपूर - वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टरचा वर्धेहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रोडच्या कडेला उलटली. यात चौघांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसचालक व वाहकाचा समावेश आहे. ही घटना एमआयडीसी (बुटीबोरी) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.कोमल ज्ञानेश्वर तेलरांधे (२९, रा. केळझर, जिल्हा वर्धा), विलास मारोतराव गुळे (४०, रा. सावंगी, आसोला, जिल्हा नागपूर), बसचालक मंगेश दामोदर सालोडकर (२२, रा. पेंढरी, मध्य प्रदेश) व वाहक मारोती तुळशीराम काळबांडे (४०, रा. रामबाग, नागपूर),अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये विनोद ठाकरे (५०, रा. खापरखेडा, जिल्हा नागपूर), प्रशांत म. कृपाल (३९, रा. बेला, जिल्हा नागपूर), यज्ञेश्वर स. मोरेश्वर (४७, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा), रूपेश ह. उपाटे (२३, रा. जळगाव), विजय मा. काळे (१७, रा. धवळपेठ), शैला शेख (२४, रा. केळझर, जिल्हा वर्धा), रूपेश धकाते (३२, रा. वर्धा), विजया कै. माथरकर (१९ रा. धवळपेठ), अनिता मसराम, संगीता मतलानी, सुनील अंकुश राऊत (३०, रा. खडकी) यांच्यासह अन्य एकाचा समावेश आहे. हे सर्वजण एमएच-३२/बी-४२२१ क्रमांकाच्या खासगी बसने वर्धेहून नागपूरला येत होते. अपघात होताच एमआयडीसी (बुटीबोरी) पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार मनीष दिवटे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सर्व जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. चौघांचेही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. शिवाय, जखमींना बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. किरकोळ जखमींवर वेळीच उपचार करून सुटी देण्यात आली. या अपघातामुळे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागपूर - वर्धा मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)ट्रॅक्टरने मारला कट बसमध्ये अंदाजे २० प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा परिसरात नागपूरहून वर्धेकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरने या बसला कट मारला. त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटला आणि भरधाव बस रोडच्या कडेला जाऊन उलटली. त्यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य १२ प्रवासी जखमी झाले.