शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कैदी प्रशिक्षणाबाबत कारागृहांची उदासीनता

By admin | Updated: November 7, 2016 02:37 IST

देशातील सर्वात जास्त कारागृहांची संख्या महाराष्ट्रात असली तरी कैद्यांच्या पुनर्वसनाबाबत राज्य माघारलेले आहे.

वर्षभरात केवळ ५९५ कैद्यांना प्रशिक्षण : राज्य पिछाडीवर, कसे होणार पुनर्वसन ?योगेश पांडे  नागपूरदेशातील सर्वात जास्त कारागृहांची संख्या महाराष्ट्रात असली तरी कैद्यांच्या पुनर्वसनाबाबत राज्य माघारलेले आहे. कैद्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे अधिकाऱ्यांकडून दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबाबत कारागृह प्रशासनांची उदासीनताच दिसून येत आहे. २०१५ या वर्षभरात राज्यातील केवळ ५९५ कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या राज्यांची आकडेवारी यापेक्षा बरीच चांगली आहे. ‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) देशातील कारागृहांबाबत जारी केलेल्या २०१५ सालच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्यात एकूण १५४ विविध प्रकारची कारागृह आहेत. यात ९ मध्यवर्ती कारागृहांसोबतच जिल्हा कारागृह, महिला कारागृह, बालसुधारगृह, विशेष कारागृह इत्यादींचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या कारागृहात मिळून २०१५ मध्ये आरोप सिद्ध झालेले ७ हजार ८९१ कैदी होते. मध्यवर्ती कारागृहांमध्ये यातील ६,४७८ कैदी होते. कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात. देशातील इतर राज्यांतील कारागृहांनी यात आघाडी घेतल्याचे दिसून आले. राजस्थानमध्ये २१ हजारांहून अधिक कैद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्रात हाच आकडा अवघा ५९५ इतका होता. यातील १३४ कैद्यांना ‘हॅन्डलूम’चे प्रशिक्षण देण्यात आले. ३० कैद्यांना सुतारकाम तर ४० जणांना शिवणकाम शिकविण्यात आले. एकाही कैद्याला कृषीविषयक व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले नाही.प्रति कैदी साडेसहा हजारांचे उत्पादनविविध कारागृहांमध्ये प्रशिक्षण प्राप्त कैद्यांकडून विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. यात साधारणत: फर्निचर, हँडलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ इत्यादींचा समावेश असतो. राज्यातील सर्व कारागृहे मिळून कैद्यांनी केलेल्या उत्पादनातून १९ कोटी ४० हजार इतकी मिळकत प्राप्त झाली. राज्यातील कारागृहांत सर्व प्रकारचे २९ हजार ६५७ कैदी होते. प्रति कैदी सुमारे साडे सहा हजार रुपये किमतीच्या वस्तूंचे उत्पादन झाले. उत्पादनाच्या आकडेवारीतदेखील राज्य काहीसे माघारलेलेच दिसून येत आहे.