शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जेल शिपायाची आत्महत्या मानसिक छळातून ?

By admin | Updated: October 21, 2015 03:15 IST

जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून

नागपूर : जेल शिपाई राजाभाऊ शंकरराव वानखेडे यांनी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली असून आत्महत्येचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. राजाभाऊ वानखेडे यांनी सोमवारच्या रात्री आपल्या महाल झेंडा चौक येथील राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारागृहातून मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे संशय घेऊन या कारागृहातील १५ शिपायांना एप्रिलमध्ये अन्य कारागृहांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. राजाभाऊ यांना चंद्रपूर कारागृहात पाठविण्यात आले होते. प्रतिनियुक्तीचा काळ एक-दोन महिन्याचा असतो. तरीही अन्यत्र पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचा काळ लोटूनही त्यांच्या मूळ नेमणुकीच्या ठिकाणी परत बोलावण्यात आले नाही. या शिवाय त्यांच्या रजाही बंद करण्यात आल्या आहेत. सुमारे दीडशेवर कर्मचाऱ्यांच्या रजेचे अर्ज अद्यापही वरिष्ठांच्या टेबलवर धूळखात पडून आहेत. राजाभाऊ वानखेडे यांना रजा तर मिळत नव्हतीच, शिवाय चार महिन्यापासून त्यांचा पगारही रोखण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या जीपीएफमधून एक लाख रुपये काढले होते. रजा आणि वेतन अडविण्यात आल्याने ते मानसिक त्रस्त झाले होते. त्यामुळे मद्याच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या केली, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)