शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचा दौरा दोन तास लांबणार ?

By admin | Updated: April 9, 2017 02:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात येत आहेत. त्यांचे नागपुरात सकाळी १०.४० वाजता आगमन होईल, ....

पुण्यात त्याच वेळी राष्ट्रपतींचा दौरा : भाजपातर्फे २५ हजारांच्या उपस्थितीचे लक्ष्य नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिल रोजी नागपुरात येत आहेत. त्यांचे नागपुरात सकाळी १०.४० वाजता आगमन होईल, असा प्राथमिक दौरा प्रशासनाने आखला होता. मात्र, त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता पुण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन होत आहे. यामुळे पंतप्रधानांचा नागपूर दौरा दोन तास लांबण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती व पंतप्रधान यांना उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. राज्य व देशपातळीवरील सुरक्षा यंत्रणेला अलर्ट रहावे लागते. १४ एप्रिल रोजी पुण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तर नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. प्राप्त माहितीनुसार या दोन्ही ठिकणाची आगमनाची वेळ सकाळी १०.३० ते १०.४० च्या दरम्यानची आहे. राष्ट्रपतींचे राज्यात आगमन होणार असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पुण्यात स्वागतासाठी उपस्थित रहावे लागणार आहे. या सर्व तांत्रिक बाजू पाहता पंतप्रधान मोदी यांचा नागपूर दौरा दोन तास लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोदी यांचे आता दुपारी १२.४५ ते १.१५ च्या दरम्यान नागपुरात आगमन होईल, अशा हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. दौऱ्याबाबत प्रशासनातर्फे अधिकृत वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, नागपूर शहर व भाजपातर्फे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. शनिवारी पक्षाच्या मंगलम, गणेशपेठ येथील कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके आदी उपस्थित होते. मानकापूर क्रीडा संकुल येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेला शहर व जिल्ह्यातील सुमारे २५ हजार लोक उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तयारासाठी १० ते १२ एप्रिल दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय मंडळांच्या बैठका घेतल्या जातील. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)