शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वायुसैनिकांचे पालक असण्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:43 IST

आकाशात उडणारे विमान पाहताना मोठेपणी पायलट (वैमानिक) होऊन सैन्यात फायटर प्लेन किंवा विमान चालविणे हे प्रत्येकाने लहानपणी हमखासपणे जोपासलेले स्वप्न.

ठळक मुद्देसैनिक म्हणजे हिरोच : देवांकित, केतकी, ईशान यांनी वाढविली शान

निशांत वानखेडे/अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आकाशात उडणारे विमान पाहताना मोठेपणी पायलट (वैमानिक) होऊन सैन्यात फायटर प्लेन किंवा विमान चालविणे हे प्रत्येकाने लहानपणी हमखासपणे जोपासलेले स्वप्न. प्रत्येक ाचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही, मात्र वैमानिकांबद्दलचे आकर्षण कमी होत नाही. सैनिक म्हटले की, देशसेवेला समर्पित केलेले जीवन. त्यामुळे स्थलसेना असो, नौदल असो की वायुसेना, यात सेवा देणाºयांबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक आस्था आहे. हे सैनिक म्हणजे सलाम करावा असे हिरोच. त्यामुळे संपूर्ण देशवासी ज्यांच्याविषयी आपुलकी बाळगून आहेत, त्यांच्या पालकांना किती अभिमान वाटावा?लहानपणी बोबडे बोलताना वायुसेनेत जायचे आहे असे सांगावे आणि मोठेपणी प्रत्यक्ष ते स्वप्न पूर्ण करावे, तेव्हा पालकांचा ऊर भरून येणार नाही तर नवल.‘वायुसेना दिना’निमित्त वायुसेनेत निवड झालेल्या नागपूरच्याही अशा ‘हिरों’नी शहरवासीयांना गौरवान्वित केले आहे. सुखोई पायलट फ्लाईट लेफ्टनंट देवांकित शिरपूरकर, स्क्वॉड्रन लीडर ईशान केळकर आणि फ्लाईट लेफ्टनंट केतकी टोळ या नागपूरकर हिरोंच्या पालकांशी लोकमतने संवाद साधला. काळजी आहे, पण देशसेवेला समर्पित असण्याचा अभिमानही आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडचे मुख्यालय नागपूरला असल्याने हा क्षण महत्त्वाचा ठरतो.देवांकितने पाचव्या वर्गातच घेतला निर्णयसुखोई ३०एमकेआयचा चालक फ्लाईट लेफ्टनंट देवांकित शिरपूरकर सध्या पुण्यात सेवारत आहे. त्याचे वडील मिलिंद शिरपूरकर यांनी सांगितले, तो पाचव्या वर्गात असताना त्याला कस्तूरचंद पार्कवर असलेले रिमोटवर उडणाºया प्लेनचे प्रदर्शन पाहायला नेले होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने अगदी लक्षपूर्वक पाहिले आणि बाहेर निघताच वायुसेनेत करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली.‘त्याची आई मुग्धा व मी, आम्ही त्याचे बोलणे गंभीरपणे घेतले नाही. मात्र तरुणपणीही करिअर निवडताना तो वायुसेनेच्या निवडीवर ठाम होता.’ आम्हीही त्याच्या इच्छेनुसार प्रोत्साहन दिले. मिलिंद म्हणाले,‘देवाने तुमच्या खांद्यावर असलेल्या मुलाला विशेष करण्यासाठी पाठविले आणि या कथेवर माझा विश्वास आहे.’ सेवानिवृत्त एसीपी असलेले मिलिंद सांगतात,‘तुमचा मुलगा सैन्यात पायलट आहे, असे कुणाकडून ऐकतो तेव्हा अभिमान वाटतो.’ शिरपूरकर यांना एकच मुलगा आहे. मात्र ‘मला आणखी दोन मुले असती तर एकाला सैन्यात आणि दुसºयाला नौदलात पाठविले असते’, असे मनोगत मिलिंद शिरपूरकर यांनी व्यक्त केले.केतकीने निर्णय सार्थ केला : टोळ‘केतकीने सातवीत असताना पायलट होण्याची इच्छा केली होती. मोठेपणी हे आकर्षण कमी होईल असे आम्हाला वाटले, मात्र तसे झाले नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि वायुसेनेची सेवा पत्करून तिने निर्णय सार्थ ठरविला.’ वायुसेनेच्या सहारनपूर बेसवर सेवारत फ्लाईट लेफ्टनंट केतकी टोळ यांचे वडील जिल्हा परिषदेत अभियंता असलेले मंगेश टोळ यांनी केतकीबाबत ही आठवण सांगितली. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर केतकीने वायुसेनेत जाण्याची लहानपणीची इच्छा व्यक्त केली. तिच्या आईला काळजी वाटली. मात्र आम्ही तिच्या निवडीत अटकाव केला नाही. इच्छेप्रमाणे ती अ‍ॅफकॅट(एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट)ची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि वायुसेनेत जाण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले. आज तिच्या निवडीचा आम्हाला अभिमान वाटतो, असे मनोगत मंगेश टोळ यांनी व्यक्त केले. ‘आज प्रत्येक क्षेत्रात रिस्क आहे. तरुण मुले त्यांच्या करिअरबाबत ठाम आहेत. पालकांनीही त्यांच्या निवडीचा सन्मान करणे आवश्यक आहे.’ असे मत व्यक्त करताना आम्हाला केतकीच्या निवडीचा अभिमान आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली.