शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मागचे मिळाले नाहीत, भविष्यातही मिळणार नाही

By admin | Updated: May 2, 2015 02:21 IST

राज्यातील सरकार बदलले परंतु विदर्भाच्या भाग्यात मात्र फारसा फरक पडलेला नाही.

नागपूर : राज्यातील सरकार बदलले परंतु विदर्भाच्या भाग्यात मात्र फारसा फरक पडलेला नाही. मागच्या सरकारद्वारे विदर्भासाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांपैकी ८६ कोटी रुपये वित्तवर्ष संपल्यावरही मिळालेले नाही. दुसरीकडे नवीन सरकारने सुद्धा विदर्भाला विशेष निधी देण्याचा निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही. दरम्यान विदर्भ विकास मंडळाने राज्य सरकारच्या नियोजन विभागाला पत्र पाठवून मागच्या वर्षीची थकीत रक्कम यावर्षी देण्याची मागणी केली आहे. परंतु सरकारतर्फे अद्याप कुठलेही उत्तर आलेले नाही. राज्यातील वैधानिक विकास मंडळांना १०० कोटी रुपयांचा विशेष निधी २०११ पर्यंत मिळत होता. लोकसंख्येच्या आधारावर हा निधी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात वितरित केला जायचा. परंतु राज्य सरकारने हा विशेष निधी बंद केला आहे. गेल्यावर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मागच्या सरकारने तिन्ही मंडळांना प्रत्येकी १०० कोटी रुपयांचा विशेष निधी वितरित केला होता. परंतु विदर्भ वैधानिक विकास मंडळाला मात्र या निधीपैकी केवळ १४ काटी रुपयेच मिळाले. यावर्षी भाजपच्या अर्थसंकल्पात या निधीसंबंधात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. वैधानिक विकास मंडळाचा कार्यकाळ आणखी पाच वर्षे वाढविण्यात आल्याने विशेष निधीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मंडळातील सूत्रानुसार गेल्या वर्षी खर्च करण्यात आलेल्या रकमेचा हिशोब सादर करून उर्वरित रक्कम नवीन वित्त वर्षात देण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.