शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच

By admin | Updated: May 28, 2017 02:33 IST

आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला

रामदास आठवले : विरोधी पक्ष एकत्र आले तरी फरक पडणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजवर सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार हे राष्ट्रपती बनले आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी आवश्यक मतापेक्षा भाजपा महायुतीला १८ हजार मते कमी पडत असली तरी ती मिळविणे फार कठीण नाही. विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी फरक पडणार नाही. राष्ट्रपती भाजपा महायुतीचाच होईल, असा दावा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आ.) अध्यक्ष व केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार होणार असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवार यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार होऊ नये. पवार हे कधीही हरण्यासाठी निवडणूक लढत नाही. त्यामुळे ते स्वत: राष्ट्रपती पदासाठी उभे राहणार नाही, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या ७० वर्षांत जे झाले नाही, ते गेल्या तीन वर्षात करण्याचा प्रयत्न झाला. काही लोक संविधान बदलण्यात येणार असल्याचा आरोप करतात, परंतु भारताचे संविधान बदलले जाणार नाही तसेच आरक्षणही कायम राहील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सहारनपूर येथील घटना ही चुकीचीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थूलकर, बाळू घरडे आदी उपस्थित होते. दीक्षाभूमी हाच माझा संघ भाजपाचे सरकार आले तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र व राज्यातील मंत्री व आमदाराने एकदा तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. तेव्हा आपण केंद्रात मंत्री असल्याने आपणही रास्वसंघ मुख्यालयाला भेट देणार का? अशी विचारणा पत्रकारांनी आठवले यांना केली असता, त्यांनी दीक्षाभूमी हाच माझा संघ असल्याचे स्पष्ट केले. माझ्या पक्षाने भाजपाशी युती केली आहे, तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाण्याचा प्रश्नच येत नाही. रिपाइं ऐक्यासाठी राजीनामा द्यायला तयार रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाची एकजूट ही आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्य टिकविण्याची जबाबदारी घेतल्यास मी स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे.