शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

व्यंगचित्र प्रदर्शनाचा पुरस्कार वितरण समारंभ आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 02:58 IST

लोकमत समूहाच्यावतीने जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लक्ष्मण’रेषा व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले.

व्यंगचित्रांच्या कार्यशाळेने रंगत : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचा उपक्रमनागपूर : लोकमत समूहाच्यावतीने जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून ‘लक्ष्मण’रेषा व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ४ मे रोजी करण्यात आले. या प्रदर्शनाचा समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा ८ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दर्डा आर्ट गॅलरीत होईल. प्रदर्शनात व्यंगचित्र प्रदर्शित करणाऱ्या श्रेष्ठ व्यंगचित्रकारांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या समारंभाला माजी खा. बनवारीलाल पुरोहित प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा राहतील. नवोदित व्यंगचित्रकारांना मंचनागपूर : रविवारच्या कार्यक्रमाला सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांना प्रामुख्याने आमंत्रित करण्यात आले आहे. विदर्भातील व्यावसायिक आणि नवोदित व्यंगचित्रकारांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन लोकमतने केले होते. या प्रदर्शनाला विदर्भातील व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाच; पण रसिकांनीही मोठ्या संख्येने या प्रदर्शनाचा लाभ घेत व्यंगचित्र समजून घेण्याचा आनंद घेतला. प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यावसायिक व्यंगचित्रकारांनी नवोदितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यामुळे रोज व्यंगचित्रकारांसाठी कार्यशाळा झाली. व्यंगचित्रांकडे एका वेगळ्या वैचारिक दृष्टीने पाहण्याची नजर या प्रदर्शनामुळे लाभल्याचे समाधान रसिकांनी व्यक्त केले. याशिवाय व्यंगचित्र कसे काढावे, याचे ज्ञान या प्रदर्शनातून मिळाल्याचे मत व्यंगचित्रकारांनी व्यक्त केले. यानिमित्ताने सर्व व्यंगचित्रकार एकत्रित आले. या महत्त्वाच्या ठरलेल्या आणि कलाक्षेत्राला ऊर्जितावस्था देणाऱ्या प्रदर्शनाच्या समारोपाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्व चित्ररसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे यांनी केले आहे.