शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला लॉजिस्टिक हब म्हणून सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:43 IST

नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून कॉर्पोरेट क्षेत्रासमोर लॉजिस्टिक हबच्या स्वरूपात सादर करण्याचे आवाहन या क्षेत्रातील विशेषज्ञांनी येथे केले.

ठळक मुद्दे‘वेद’चे आयोजन : चर्चासत्रात विशेषज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असून कॉर्पोरेट क्षेत्रासमोर लॉजिस्टिक हबच्या स्वरूपात सादर करण्याचे आवाहन या क्षेत्रातील विशेषज्ञांनी येथे केले.विदर्भ एकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) वतीने शनिवार, ७ आॅक्टोबरला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये ‘नागपूर उदयास येणारे लॉजिस्टिक हब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आ. आशिष देशमुख, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपाध्यक्ष शिवकुमार राव, प्रदीप माहेश्वरी, महासचिव राहुल उपगन्नलावार, गोविंद डागा, कोईग्न कन्सलटिंगचे संस्थापक संचालक आरिफ सिद्दिकी, डिस्ट्रिब्यूशन लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यनाथन, रिव्हिगोचे व्यावसायिक प्रमुख संबित सत्पथी उपस्थित होते.उद्घाटन सत्रात आरिफ सिद्दिकी यांनी सांगितले की, भौगौलिकदृष्टीने नागपूर देशाच्या केंद्रस्थानी आहे.त्यानंतरही नागपूर सकारात्मक वातावरणाअभावी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठी गुंतवणूकदार आकर्षित करू शकले नाही. सकारात्मक वातावरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कुशल मानव संसाधनाच्या निर्मितीची गरज आहे. त्यानंतरच गुंतवणूकदार आकर्षित होऊन नागपूर लॉजिस्टिक हब बनू शकते.यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रासमोर नागपूरला लॉजिस्टिक्स हबच्या स्वरुपात सादर करावे लागेल. जीएसटी लागू झाला आहे. पण त्याचे फायदे वर्षानंतर दिसून येतील.के. सत्यनाथन यांनी सांगितले की, दक्षिण नागपुरात आधुनिक सुविधायुक्त लॉजिस्टिक्स झोन बनविण्याची गरज आहे. झोनमध्ये निवासी कॉलनी बनविण्याची परवानगी देऊ नये. तसेच माथाडी कायद्यांतर्गत आवश्यक सूट मिळाली पाहिजे.सरकारला अधिग्रहित जमिनीच्या ‘चेंज आॅफ लँड यूज’करिता (सीएलयू) शुल्क व कर कमी करणे, आवश्यक मंजुरीसाठी एकल खिडकी योजना राबविण्याची गरज आहे. यावेळी संबित सत्पथी यांनी मार्गदर्शन केले.