सुपर श्रीमंतांचा आयकर वाढलासरकारला मिळणार ८३० कोटी महसूलसोपान पांढरीपांडे नागपूरएक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सुपर श्रीमंतांसाठी बजेटमध्ये आयकराचा नवीन दर येणार असल्याची बातमी लोकमतने रविवारच्या अंकात छापली होती. ही बातमी तंतोतंत खरी ठरल्याचे आज बजेटवरून सिद्ध झाले.अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आयकरच्या दरांमध्ये कुठलाही बदल केला नाही. फक्त एक कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्या सुपर श्रीमंतांवर मात्र ३ टक्के सरचार्ज वाढविला आहे. हा सरचार्ज आता १२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आता ३५.४० टक्के या दराने आयकर भरणा करावा लागेल. आधी हा दर ३४.५० टक्के होता. परिणामी एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या ८३ हजार करदात्यांवर प्रत्येकी किमान १ लाख रुपयाचा आयकराचा बोझा वाढणार आहे. त्यामुळे सरकारला दरवर्षी किमान ८३० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. याचबरोबर कंपनी कराचे दर माफक असल्यामुळे त्यात बदल होणार नाही, हे लोकमतचे भाकितही बरोबर ठरले आहे.
लोकमतचे भाकीत खरे ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:56 IST