शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

नागपूरच्या प्रशांत नासेरीचा पुण्यात विक्रम

By admin | Updated: May 4, 2017 02:09 IST

सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांनी गायलेल्या मुसाफिर हूँ यारो... तेरे चेहरे में वो जादू है... ये शाम मस्तानी...

‘हरफनमौला’ला रसिकांची दाद: गायिली १७ तास गाणी नागपूर:सुप्रसिद्ध पार्श्वगायक किशोरकुमार यांनी गायलेल्या मुसाफिर हूँ यारो... तेरे चेहरे में वो जादू है... ये शाम मस्तानी... कोरा कागज था ये मन मैरा... नदियाँ से दरीयाँ... अशी अवीट गीते सलग १७ तास गाऊन प्रसिद्ध गायक प्रशांत नासेरी यांनी सचिन तेंडुलकरला खास गीतमय शुभेच्छा दिल्या. हा एक विक्रम ठरला असून लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड्स, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद होणार आहे. प्रशांत नागपूरचा राहणारा असून येथील एलआयटी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बारावीचे शिक्षण शिवाजी सायन्स कॉलेजमधून घेतले. या विक्रमाबद्दल येथील चाहत्यांनी मंगळवारी एका समारंभात प्रशांतचा सत्कार केला. यावेळी त्याने आपला सूरमयी प्रवास उलगडला. बालपणापासून गायनाची आवड असलेल्या प्रशांतने आजवर शेकडो मैफलींमधून रसिकांना रिझविले आहे. असा झाला विक्रम लाडक्या सचिन तेंडुलकर याच्या ४४व्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांची १६१ हून अधिक गाणी त्याने गायिली. पुण्यातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ८ ला ‘हरफनमौला किशोरकुमार’ या संगीत गाण्याच्या कार्यक्रम सादरीकरणाला प्रशांत नासेरी यांनी सुरुवात केली आणि रात्री १२ च्या सुमारास हा विक्रम पूर्ण झाला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, संदीप पंचवाटकर, जितेंद्र भुरुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. काश्मीरहून आलेल्या गायिका इंदू बाला, नीलेश जेधे, विवेक थिटे, अनन्या महापात्रा, नरेंद्र शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डुएट गाण्यांसाठी सुवर्णा माटेगावकर, मधुरा दातार, जितेंद्र भुरुख, जितेंद्र अभ्यंकर, श्रावणी रवींद्र, राधिका अत्रे, धवल चांदवडकर, रेवा तिजारे, इंदू बाला (जम्मू) यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)