शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई किट, अँटिजेन टेस्ट अन् सीबीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआय कारवाईची शनिवारी सकाळी झालेली सुरुवात अनपेक्षित अन् ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआय कारवाईची शनिवारी सकाळी झालेली सुरुवात अनपेक्षित अन् नाट्यमय होती. तर कारवाई संपल्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा नाट्यमय घडामोड घडली. पहिल्या टप्प्यातील कारवाईचे स्वरूप गुलदस्त्यात होते अन् दुसऱ्या टप्प्यातील कारवाईदेखील वृत्त लिहिस्तोवर तशीच गुलदस्त्यात राहिली.

देशमुख नेहमीप्रमाणे शनिवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतले. ते निवासस्थानाच्या दारावर येताच दोन मोठ्या वाहनात बसून असलेले सीबीआयचे दहा जणांचे पथक भरभर त्यांच्याजवळ पोहोचले. सर्वच्या सर्व पीपीई किट घालून होते. आज देशमुखांच्या निवासस्थानी काही जणांची अँटिजेन टेस्ट करण्यासाठी वैद्यकीय पथक येणार होते. त्यामुळे पीपीई किटमधील वैद्यकीय पथक असावे, असे देशमुखांना वाटले; मात्र दुसऱ्याच क्षणी एका अधिकाऱ्याने समोर होऊन आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत, असे सांगून आपल्या निवासस्थानी आम्ही चौकशी करण्यासाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील पाच ते सात सदस्य, घरातील नोकर आणि एक स्वीय सहायक तसेच टेलिफोन ऑपरेटर एवढी मंडळी होती. त्या सर्वांना सीबीआयच्या पथकाने हॉलमध्ये बसविले आणि चौकशी सुरू केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अँटिजेन टेस्ट करण्यासाठी एक वैद्यकीय पथक देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि प्रसारमाध्यमांची मंडळी उभी होती. वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आतमध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले..

---

वेगवेगळ्या तपास यंत्रणा बंगल्यासमोर

देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा घातल्याची माहिती वायूवेगाने सर्वत्र पोहोचली. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या अखत्यारीत असलेली सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो, स्टेट एसआयडी आणि सीआयडी आदी तपास यंत्रणांचे अधिकारी देशमुख यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. स्थानिक पोलिसांचाही मोठा ताफा सकाळपासूनच येथे होता. प्रत्येकजण आपापल्या परीने कारवाईचे स्वरूप जाणून घेण्याचा दिवसभर प्रयत्न करीत होते. मात्र, तब्बल १० तासांपर्यंत त्यांना चाैकशीत नेमके काय झाले, त्याचा थांगपत्ता लागला नाही.

----

एक पथक पुन्हा परतले, देशमुखांनाही बोलवून घेतले

६.३० ला सीबीआयचे पथक निघून गेल्यामुळे आजची कारवाई संपली, असा अनेकांनी अंदाज काढला; मात्र अर्ध्या तासातच पुन्हा दोन वाहनांपैकी एका वाहनातील अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी रस्त्यातूनच संपर्क करून देशमुख यांना बोलावून घेतले. या नाट्यमय घडामोडीमुळे पुन्हा नव्याने तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले.

----