शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबली

By admin | Updated: October 29, 2014 00:41 IST

युती मोडीत निघाल्याने भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते. परंतु दक्षिण नागपूर

शहरात पाच उमेदवार : अनामत रक्कमही जप्तनागपूर : युती मोडीत निघाल्याने भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविली. शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते. परंतु दक्षिण नागपूर मतदारसंघातील किरण पांडव वगळता शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला १० हजार मतांचा आकडा ओलांडता आलेला नाही. पश्चिम नागपुरात सेनेच्या उमेदवाराला जेमतेम ११८० मते मिळाली. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात २७६७ तर मध्य नागपूर मतदारसंघात ३२८१ मतावर समाधान मानावे लागले. शहरात शिवसेनेची शक्ती २८ हजारांवर थांबलीराज्यातील युती संपुष्टात आल्याने विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना याचा जबर फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु निवडणुकीत असे काही घडले नाही. पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विकास अंभोरे यांना जेमतेम १८८० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेला सहाव्या क्रमांकाची मते मिळाली. येथे शिवसेनेचा उमेदवार लढतीतच नव्हता. शिवसेनेच्या तुलनेत मनसे व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक मते मिळाली आहेत.दक्षिण-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे पंजू तोतवाणी यांना २७६७ मते मिळाली. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना उमेदवाराला चांगली मते मिळतील असा दावा केला जात होता. परंतु प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही.या मतदारसंघात १६ उमेदवार उभे होते. यात तोतवाणी यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. येथे भाजप-काँग्रेस अशी सरळ लढत झाली. यात भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.दक्षिण नागपूर मतदारसंघात शिवसेनेचे किरण पांडव चमत्कार घडवतील अशी अपेक्षा होती. परंतु मोदी लाटेत पांडव यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना १२,८६३ मते मिळाली. पूर्व नागपूर मतदारसंघात शिवसेनेचे अजय दलाल निवडणुकीत उभे होते. त्यांना पाचव्या क्रमांकाची ७४८१ मते मिळाली. मध्य नागपूर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सतीश हरडे यांना ३२८१ मते मिळाली. त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. उत्तर नागपुरात शिवसेनेला सक्षम उमेदवार न मिळाल्याने निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा नव्हता. महापालिक ा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना जितकी मते मिळाली होती, किमान ही मते सेनेच्या उमेदवारांना मिळतील अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात असे घडले नाही. (प्रतिनिधी)