शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे गहू , तांदूळ बंद

By admin | Updated: July 22, 2015 03:25 IST

अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या केशरी कार्डधारक तब्बल पावणेदोन कोटी गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले आहे.

लोकमत विशेषकमलेश वानखेडे नागपूरअन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या केशरी कार्डधारक तब्बल पावणेदोन कोटी गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केशरी कार्ड धारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाहीत. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केल्याची टीका होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. राज्यात ८ कोटी ७७ लाख लोकांना स्वस्त दरात धान्यपुरवठा केला जात होता. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने यापैकी ७ कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा लागू केली होती. या नागरिकांना २ रुपये किलो प्रमाणे गहू व ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो. उर्वरित १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजे केशरी कार्ड धारक आहेत. या नागरिकांची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. शासकीय त्रुटींमुळे यातील अनेकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षेत समावेश होऊ शकलेला नाही. या केशरी कार्डधारक (एपीएल) पावणेदोन कोटी नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून आघाडी सरकारने ७.२० रुपये प्रती किलो दराप्रमाणे १० किलो गहू व ९.६० रुपये प्रती किलो दराप्रमाणे ५ किलो तांदुळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणाऱ्या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. ही योजना राबविण्यासाठी राज्य सरकारला स्वत:च्या तिजोरीतून दरमहा १२० कोटी रुपये द्यावे लागत होते. वर्षाकाठी सुमारे १४०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकारवर पडत होता. पण पावणेदोन कोटी लोकांना स्वस्तात धान्य मिळून त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटत होता.