शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वीच पोलखोल!

By admin | Updated: June 11, 2017 02:07 IST

अद्याप पावसाळा सुरू व्हायचाच आहे. मुसळधार पाऊ स बरसलेला नाही. परंतु सिमेंट रोडची कामे करताना पावसाळी नाल्या,

सिमेंट रोडच्या त्रुटी बनल्या समस्या अर्धवट व निकृष्ट काम पाणी तुंबणार; नागरिक होणार त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अद्याप पावसाळा सुरू व्हायचाच आहे. मुसळधार पाऊ स बरसलेला नाही. परंतु सिमेंट रोडची कामे करताना पावसाळी नाल्या, जुन्या नाल्या व सिवेज लाईनच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट त्या कचरा व मलब्यामुळे बुजवण्याचेच काम करण्यात आले. त्यातच अर्धवट व निकृष्ट कामामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे सिमेंट रोडवर पाणी तुंबण्याला सुरुवात झाली आहे. शनिवारी शहराच्या विविध भागात याचा प्रत्यय आला. सिमेंट रोडची उंची रोडलगतची घरे व दुकानापेक्षा अधिक ठेवण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात आजूबाजूच्या वस्त्यात पाणी शिरणार असल्याबाबत वृत्त प्रकाशित करून लोकमतने याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु याची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दक्षिण नागपुरातील ईश्वरनगर-रमणा मारोती रोडचे सिमेंटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शनिवारी जोराचा पाऊ स झाला नाही तरीही रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. रोडच्या सिमेंटीकरणाचे काम मध्य भागातून सुरू करण्यात आले. परंतु हा भाग समतल करण्यात आलेला नाही. यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता रोडवर तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. ज्या भागातील रोडचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही तेथील भागात खोदकाम करुन अर्धवट सोडण्यात आले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत आहे. यातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. रोडवर पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. सुभाननगर, भारतनगरात घरात शिरले पाणी सुभाननगर, भारतनगरात भागात काही दिवसापूर्वी बनविण्यात आलेले सिमेंट रोड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. पूर्व नागपुरात शनिवारी पाऊ स झाला. मात्र मुसळधार पाऊ स झाला नसतानाही सुभाननगर, भारतनगर येथील सिमेंट रोडलगतच्या घरात पाणी शिरले. सिमेंट रोडची कामे नागरिकांना सुविधा व्हावी. म्हणून हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु हेच सिमेंट रोड नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रज्जाक पटेल यांनी व्यक्त केली. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुसळधार पावसात काय होईल ? सिमेंट रोडचे काम रोडच्या मध्य भागातून सुरू करण्यात आले आहे. रोडच्या दोन्ही टोकाकडून कामाला सुरुवात केली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनुराग राघोर्ते यांनी दिली. रोडच्या मध्येच काम सुरू केल्याने खड्डे निर्माण झालेले आहेत. यात पावसाचे पाणी साचत आहे. रोडलगतच्या घरापुढे पाणी तुंबले आहे. थोड्याशा पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली; मुसळधार पाऊ स आला तर काय होईल, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पादचाऱ्यांत भीती सिमेंट रोडचे काम करताना कंत्राटदाराने रोडच्या दोन्ही बाजूंना पावसाळी नाल्या व सिवेज लाईनसाटी चेंबर ठेवलेले नाही. यामुळे रोडवर पाणी साचले आहे. खोल खड्ड्यात पाणी साचल्याने यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पादचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे निरपराध नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याकडे स्थानिक आमदारांचेही दुर्लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.