शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षच समाजात भेद पाडतात

By admin | Updated: July 9, 2016 03:05 IST

जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे.

भय्याजी जोशी : अस्पृश्यता हा समाजातील मानसिक आजारनागपूर : जाती ही विकृती आहे, त्यामुळे मोठे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात देश भरडला जात आहे. वर्तमानात या सामाजिक प्रश्नांना राजकीय रूप येत आहे. देशातील कुठलाही राजकीय पक्ष जाती, वर्ण व्यवस्थेला दूर करू शकत नाही. उलट राजकीय पक्षांचा स्वभाव हा समाजात भेद पाडण्याचा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केली. भारत मंगलम या संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त व रा.स्व.संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सामाजिक समरसता’ या विषयावर भय्याजी जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवारी संत रविदास सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जोशी यांनी राजकीय पक्षांवर कडाडून टीका केली. राजकीय पक्ष सामाजिक प्रश्न दूर करण्याऐवजी ते टिकून कसे राहतील हाच प्रयत्न करतात. त्यामुळेच ते जातीचे गणित मांडतात. सामाजिक प्रश्न हे समाजानेच सोडवायचे आहे. राजकीय पक्षांकडून सामाजिक समरसतेची अपेक्षाच करू नये. जोशी यावेळी म्हणाले की, ईश्वर एक शक्ती आहे. मूर्तीतर तुम्हीआम्ही घडविल्या आहेत. जगाच्या कल्याणाचा जो विचार करतो तोच खरा ईश्वरनिष्ठ आहे. या ईश्वरनिष्ठ मंडळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाळासाहेब देवरस आहेत. कालप्रवाहात अनेक गोष्टी विसंगत होत गेल्या. तत्त्वज्ञान हे ग्रंथातच राहिले. तत्त्व आणि व्यवहारात अंतर पडले. त्यातून रुढी, परंपरा, कर्मकांड प्रस्थापित झाले. यालाच लोक धर्म समजू लागले. तत्त्वाशी विसंगत करणारा समाज होत गेला. त्यामुळे समाजात भेद निर्माण झाले. जाती, उपजाती निर्माण झाल्या आणि त्या समाजाच्या अंतर्मनात खोलवर रुजल्या. त्यातूनच अस्पृश्यता हा शब्द उदयास आला. अस्पृश्यता ही आजारासारखी समाजात पसरली. ही अस्पृश्यता, जाती व्यवस्था समाजावर लागलेला काळा डाग आहे. ते दूर करण्याचे काम समाजानेच करायचे आहे. त्यासाठी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. ही जाती व्यवस्था, अस्पृश्यता संपविण्यासाठी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजनैतिक क्षेत्रातील विषमता संपविल्या पाहिजे. सर्वांना समान विकासाच्या संधी दिल्या पाहिजे. समान संधीचा विचार करताना, जो मागे आहे, त्याला काही विशेष संधी द्यायला पाहिजे. समाजात मागे राहिलेला वर्ग एकाच रेषेत आल्यास तरच देशात सामाजिक समरसता निर्माण होईल, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. समाज जीवन सुधारण्यासाठी १८०० ते १९०० या काळात देशात अनेक सुधारकांची मालिकाच उभी राहिली. परंतु या सुधारकांना जातीत विभागून टाकले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा समाज पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. जाती व्यवस्थेला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. अशा व्यवस्थेवर समाज जीवन जगू शकत नाही, अशी भूमिका संघाचीआहे. व्याख्यानाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चिचोलीचे संजय पाटील, भारत मंगलमचे अध्यक्ष गिरीश हरकरे, कार्याध्यक्ष संतोष माहूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष माहूरकर यांनी केले. आभार दीपक काळी यांनी मानले. (प्रतिनिधी)