शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांत उच्चशिक्षितांचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: February 14, 2017 01:56 IST

नागपूर मनपा निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे.

६४ टक्के उमेदवार ‘अंडरग्रॅज्युएट’ ७ टक्के जणांकडेच पदव्युत्तर शिक्षणकेवळ ६ ‘पीएचडी’ उमेदवार रिंगणातयोगेश पांडे नागपूरनागपूर मनपा निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच थोडा असल्याचे चित्र आहे. शहरातील ३८ प्रभागांतून केवळ ८८ पदव्युत्तर उमेदवारांनाच निवडणुकांच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उच्चशिक्षितांना डावलले असून ६४ टक्के उमेदवारांचे शिक्षण हे केवळ बारावीपर्यंतच झाले आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. मात्र प्रत्यक्ष निवडणुकांत कमी शिक्षण घेतलेल्यांनाच प्राधान्य देत शिक्षितांना राजकीय प्रवाहात आणण्यासंदर्भाच पक्ष उदासीन असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. शहरात एकूण १ हजार १३५ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ ८८ उमेदवारांकडे पदव्युत्तर पदवी आहे. आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या केवळ ७.७५ टक्के इतकीच आहे. ‘पीएचडी’ उमेदवारांची संख्या तर अवघी ६ इतकीच आहे. तर १८५ उमेदवार हे पदवीधर आहेत. केवळ २४.५ टक्के उमेदवारांचे शिक्षण पदवी किंवा त्याहून अधिक झाले आहे. ४९५ उमेदवारांनी ‘कॉलेज’च पाहिले नाहीनिवडणुकांच्या रिंगणात असलेल्यांपैकी ४९५ उमेदवारांचे केवळ शालेय शिक्षणच झाले आहेत. दहावी किंवा त्याहून कमी शिक्षण झालेल्यांची टक्केवारी ४३.६१ टक्के इतकी आहे. यातील अर्ध्याहून अधिक उमेदवारांचे शिक्षण तर नववी किंवा त्याहून कमी झालेले आहे.काँग्रेस-भाजपा ‘सेम टू सेम’निवडणुकांच्या निकालानंतर जिंकणाऱ्या उमेदवारांची आकडेवारी आत्ताच सांगता येणार नाही. मात्र भाजपा व कॉंग्रेसने एका बाबतीत मात्र समान संख्या नक्कीच गाठली आहे. दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ४९५ इतकी आहे. यात भाजपा व कॉंग्रेसमधील प्रत्येकी ५३ उमेदवारांचा समावेश आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या १६० इतकी आहे.१६ उमेदवार अशिक्षितविविध राजकीय पक्ष व अपक्ष असे मिळून १६ अशिक्षित उमेदवार निवडणुकांत उतरले आहेत. यात सहा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. बसपा व राष्ट्रीय जनसुराज्य पक्षातर्फे दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मुस्लीम लीग, भारिप बहुजन महासंघ, एमआयएम, आरपीआय (सेक्युलर) या पक्षांतर्फे प्रत्येकी एक अशिक्षित उमेदवार उभा आहे.‘पीएचडी’ झालेले उमेदवार : डॉ.परिणिता फुके, डॉ.विशाखा जोशी, डॉ.समिधा पांडे, डॉ.वैजयंती सेनाड, डॉ.हरीश मोहिते, डॉ.रेखा बारहाते