शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

पोलीस आत्महत्येत नागपूर राज्यात दुसरे

By admin | Updated: May 5, 2015 02:02 IST

राहुल अवसरे - नागपूर पोलीस आत्महत्येत नागपूर शहर संपूर्ण राज्यात दुसरे आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ४३ टक्के आत्महत्यांचे कारण अज्ञात असून नऊ टक्के आत्महत्या या केवळ तणावातून झालेल्या आहेत.

राहुल अवसरे - नागपूरपोलीस आत्महत्येत नागपूर शहर संपूर्ण राज्यात दुसरे आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ४३ टक्के आत्महत्यांचे कारण अज्ञात असून नऊ टक्के आत्महत्या या केवळ तणावातून झालेल्या आहेत. १९ टक्के आत्महत्या या गोळी झाडून झालेल्या आहेत. ही धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. ही माहिती २०१० ते २०१३ या चार वर्षातील आहे. २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये २८, २०१२ मध्ये २७ आणि २०१३ मध्ये सर्वाधिक ४३ , अशा एकूण १२९ आत्महत्येच्या घटना घडल्या. पोलीस आत्महत्येच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशात पहिल्या स्थानावर आहे. शिपायांच्या अधिक आत्महत्याराज्यात चार वर्षात घडलेल्या एकूण आत्महत्यांपैकी १०४ (८१.४२ टक्के) आत्महत्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर २५ (१९.३७ टक्के) आत्महत्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यात १ पोलीस अधीक्षक, ७ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, ७ उपनिरीक्षक, ८ सहायक पोलीस उपनिरीक्षक , २३ हेड कॉन्स्टेबल, २८ पोलीस नायक शिपाई आणि ५३ पोलीस शिपायांचा समावेश आहे. नागपुरात ११ आत्महत्यापोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी ५६ आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ७३ घटना घडल्या. त्यापैकी मुंबईमध्ये १८, नागपूर ११, पुणे ९, औरंगाबाद ६, ठाणे ४, मुंबई रेल्वे ३, अमरावती २, नवी मुंबई २ आणि नाशिकमध्ये १ घटना घडली. जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा ७, यवतमाळ ६, पुणे ग्रामीण ५, अमरावती ग्रामीण ५, औरंगाबाद ग्रामीण, परभणी आणि गडचिरोलीत प्रत्येकी ४, अकोला, कोल्हापूर, बीड, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहमदनगर आणि ठाणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी ३, गोंदिया, हिंगोली, लातूर, नांदूरबार आणि नांदेडमध्ये प्रत्येकी २, सिंधूदुर्ग, नागपूर ग्रामीण, जळगाव, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड आणि वाशिममध्ये प्रत्येकी १ घटना घडली.