शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी महिलांना दागिने केले परत

By admin | Updated: June 7, 2017 02:06 IST

विविध गुन्ह्याचा छडा लागल्यानंतर संबंधित फिर्यादीचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी

चोरीचा माल जप्त : सीताबर्डी पोलिसांची कामगिरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विविध गुन्ह्याचा छडा लागल्यानंतर संबंधित फिर्यादीचा शोध घेऊन त्यांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी सीताबर्डी पोलिसांनी बजावली. अनेक पोलीस ठाण्यात उशिरा आरोपी पकडतात अन् त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त होतो. मात्र, प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेकांना त्यांचा ऐवज मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. हे ध्यानात घेत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला जप्त केलेला माल ज्यांचा त्यांना परत करण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार सीताबर्डी ठाण्यातील हवालदार प्रमोद मेश्राम (मुद्देमाल मोहरर), शिपाई सुरेंद्र शेंडे, प्रेमचंद पाटील, अमित केचे यांचे पथक नेमण्यात आले. या पथकाने चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील फिर्यादी मंगला खुरसंगे (रा. झिंगाबाई टाकळी), कमला नारायणजी यादव (वय ६७, रा, रघुजीनगर, सक्करदरा) तसेच जयश्री अनंतकृष्ण अय्यर (वय ४७, रा. बजाजनगर) या तीन महिलांच्या सोनसाखळ्या तसेच जयेश वेलजीभाई कोठारी (रा. छोटी धंतोली) यांना त्यांची प्लेझर दुचाकी परत करण्यात आली. पोलीस आयुक्त व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, परिमंडळ २ च्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी ही कामगिरी बजावली. त्यांना सुखद धक्का जयश्री अनंतकृष्ण अय्यर या सरस्वती विद्यालयात प्राध्यापक तर अन्य दोघी गृहिणी आहेत. आपले दागिने परत मिळाल्यानंतर या महिला खूपच आनंदीत झाल्या. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमुळे कंटाळलो होतो. त्यामुळे दागिन्यांची आसच सोडली होती. मात्र सीताबर्डी पोलिसांनी आम्हाला आमचे दागिने मिळवून दिल्याने पोलिसांबद्दल आम्हाला अतिव आदर निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.