शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

पोलिसाचा मुलीवर बलात्कार

By admin | Updated: June 8, 2014 00:49 IST

कर्तव्याला बुट्टी देऊन एका पोलीस शिपायानेच १४ वर्षीय मुलीवर चक्क पोलीस मुख्यालयात (कर्मचारी वसाहत) बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने

यवतमाळ : कर्तव्याला बुट्टी देऊन एका पोलीस शिपायानेच १४ वर्षीय मुलीवर चक्क पोलीस मुख्यालयात (कर्मचारी वसाहत) बलात्कार केल्याची  संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर पोलीस शिपाई येथील चार्ली पथकात कार्यरत असून मुख्यालयातील शासकीय निवासस्थानात राहतो. शुक्रवारी रात्री येथील शनी मंदिर चौकात तो  इतर सहकार्‍यांसोबत कर्तव्यावर होता. दरम्यान, सहकारी पोलीस कर्मचार्‍यांना विश्‍वासात  घेऊन कर्तव्यावरून बुट्टी मारली. त्यानंतर ओळखीतीलच  एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून देण्याच्या बहाण्याने तहसील चौकातून दुचाकीवर बसविले. पोलीस मुख्यालयातील राहत्या शासकीय  निवासस्थानी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शनिवारी सकाळी १0 वाजता तिला घराच्या परिसरात सोडूनही दिले. इकडे रात्रभर मुलगी घरी न आल्याने नातेवाईक शोधाशोध करीत होते. मुलगी घरी आल्यानंतर नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. कसेबसे स्वत:ला  सावरत मुलीने आपबिती कथन केली. मात्र बदनामीच्या भीतीने ते पोलिसात जावे की नाही, या संभ्रमावस्थेत होते. अखेर सायंकाळी ६ वाजता पीडित  मुलगी आणि तिचे नातेवाईक वडगाव रोड पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी रितसर तक्रार दिली. मात्र प्रकरण पोलीस शिपायाचे असल्याने  कर्तव्यावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांची समजूत काढीत त्यांना बसवून ठेवले. सदर शिपायाला  समक्ष पाचारण करून मुलगी आणि  तिच्या नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेतले. सुरूवातीला तक्रार करू नये म्हणून पोलीस अधिकार्‍यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रात्री ८.३0 वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.  मात्र वैद्यकीय तपासणीअंती गुन्हा नोंदविला जाणार असल्याचे एका जबाबदार पोलीस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला  सांगितले. यवतमाळचे एसडीपीओ राहुल मदने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला, मात्र  प्रतिसाद मिळाला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)