शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: September 16, 2016 03:17 IST

चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

आरोपी ठाण्यातून गायब : चार दिवसांतील तिसरी घटना नागपूर : चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी झांशी राणी चौकात घडली. गुन्हा दाखल करण्याची माहिती होताच आरोपी युवक सीताबर्डी पोलीस ठाण्यातून गायब झाला. यामुळे पोलिसांत खळबळ उडाली. तुषार वर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार तुषारने सकाळी ६.३५ वाजता झांशी राणी चौकातील पेट्रोल पंपाच्या ‘कॉर्नर’वर आपली कार पार्क केली होती. झांशी राणी चौकात सकाळच्या वेळी आॅटोचालक आणि अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असते. यासंबंधात तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. घटनेच्या वेळी एपीआय अमोल चव्हाण सहकाऱ्यांसह चौकातील वाहनांना बाजूला करीत होते. शिपाई ओंकार आणि नीलेशने तुषारला सुद्धा त्याचे वाहन (कार) हटविण्यास सांगितले. परंतु तुषारने नकार देत तो पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. पोलीस कर्मचारी त्याचे चालान करून लागले असता तो असभ्य वागणुकीवर उतरला. दरम्यान अमोल नावाचा शिपाई या घटनेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत होता. ते पाहून तुषारला आणखी राग आला. तो मोबाईल हिसकवण्याच्या प्रयत्नात अमोलला धक्का-बुक्की करू लागला. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस तुषारला ठाण्यात घेऊन गेले. एपीआय चव्हाण आणि त्यांचे सहकारी सुद्धा ठाण्यात पोहोचले. घटनेची माहिती होताच तुषारचे मित्रही ठाण्यात पोहोचले. यामुळे ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. तुषार मित्रांशी बोलत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तो गायब झाला. तुषार गायब झाल्याचे माहिती होताच ठाण्यात खळबळ उडाली. तो गायब होईल याची पोलिसांना कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली. पोलिसांवर दबाव वाढल्याने सायंकाळी तुषार पोलिसांच्या हाती लागला. सीताबर्डी पोलिसांनी तुषारच्या विरुद्ध पोलिसांना मारहाण व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. मागील चार दिवसात पोलिसांना मारहाण करण्याची ही तिसरी घटना आहे. सोमवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याचे एपीआय अरविंद पवार यांच्यावर रमण असोफा आणि त्याचा भाऊ रजन असोफा याने हल्ला केला होता. डिप्टी सिग्नल निवासी असोफा बंधू त्यांचे तिसरे बंधू ऋषभला चोरीच्या संशयात ठाण्यात आणले असल्याने दुखावले होते. ऋषभचा शेजारी राजकुमार कुंगवानी यांनी आपल्या तक्रारीमध्ये ऋषभवर चोरीचा संशय घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी ऋषभला ठाण्यात आणले होते.(प्रतिनिधी) ...तर पोलिसांनी काय करावे? ४सकाळी ६ ते १० या वेळात झांशी राणी चौकात वाहतूक पोलिसांची विशेषत्वाने नेमणूक करून आॅटो व अवैध प्रवासी वाहतूक हटविली जाते. पोलिसांच्या या कारवाईला मदत करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईला सहकार्य करण्याऐवजी काही लोक त्यात खोट काढू लागतात. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पदभार स्वीकारताच शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एका विशेष चमूच्या माध्यमातून आढावा घेत सुधारण्यासाठी पाऊल उचलले आहे. या अंतर्गत झांशी राणी चौकात सकाळी ६ वाजेपासून पोलीस तैनात केले जात आहे. तेव्हा नागरिकांकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण आहे.