शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या दोषसिद्धीत पोलीस नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

राकेश घानोडे नागपूर : राज्यातील पोलीस भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध होण्यात `नंबर वन` आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून ही बाब ...

राकेश घानोडे

नागपूर : राज्यातील पोलीस भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध होण्यात `नंबर वन` आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

२०१७ मध्ये ११ प्रकरणांतील १३, २०१८ मध्ये १० प्रकरणांतील ११ तर, २०१९ मध्ये १५ प्रकरणांतील १७ आरोपी पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांना विविध कालावधीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही संख्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसेच, आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तीन वर्षात अनुक्रमे एकूण ३ लाख २६ हजार, ८२ व १ लाख ३० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. ही परंपरा यावर्षीही कायम राहिली. जानेवारीपासून आतापर्यंत सर्वाधिक ३ प्रकरणांतील ४ आरोपी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध कालावधीचा कारावास आणि एकूण १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सदर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे जाहीर करण्यात आली.

---------------

खटल्यांना कोरोनाचा ब्रेक

यावर्षी भ्रष्टाचाराच्या खटल्यांना कोरोनामुळे ब्रेक लागला. लॉकडाऊनपासून न्यायालयात केवळ अत्यावश्यक व तातडीची प्रकरणे ऐकली जाऊ लागल्याने भ्रष्टाचाराच्या खटल्यांवरील सुनावणी थांबली. परिणामी, जानेवारीपासून आतापर्यंत केवळ ९ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होऊ शकली. आधीच्या तीन वर्षांच्या आकडेवारीशी तुलना केल्यास ही संख्या फार कमी आहे. २०१९ व २०१७ मध्ये प्रत्येकी ५४ तर, २०१८ मध्ये ५६ प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली होती.

----------------

शिक्षा झालेले एकूण आरोप

वर्ष - आरोपी

२०१७ - ६२

२०१८ - ७५

२०१९ - ६५

२०२० - १३

---------------

आरोपींना ठोठावलेला दंड

वर्ष - दंड

२०१७ - १२ लाख ११ हजार ३००

२०१८ - १ कोटी १२ लाख ५००

२०१९ - १३ लाख ४० हजार ५००

२०२० - ८० हजार

---------------

वर्गनिहाय आरोपी

वर्ग - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२०

प्रथम - ०५ - ०६ - १५ - ०१

द्वितीय - ०८ - ०८ - ०७ - ०३

तृतीय - ३८ - ४१ - ३४ - ०६