शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरून उडाला खबऱ्यांचा विश्वास

By admin | Updated: September 15, 2016 02:42 IST

पोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते.

आपसी प्रतिस्पर्धा : वापर होत असल्याने बसले शांत जगदीश जोशी नागपूरपोलीस विभागात खबऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्यामुळेच गुन्हे जगतात होत असलेल्या घडामोडींची पोलिसांना माहिती होते. त्यांच्या माहितीच्या आधारावर पोलीस मोठमोठ्या प्रकरणांचा उलगडा करतात. तसेच अनेक गुन्हेगारांचे ‘प्लॅन’ फेल पाडले जातात. परंतु मागील काही दिवसांपासून पोलिसांवरून खबऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. खबऱ्यांच्या विरोधातील कारवाई, खून आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धा याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. पोलिसांचे बहुतांश खबरे हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेलेच असतात. गुन्हेगारी सोडल्यानंतर पोलीस अशा लोकांचा वापर करीत असतात. गुन्हेगारी लोकांशी असलेले संबंध, संपर्क आणि अनुभवामुळे त्यांना गुन्हेगारी जगताची माहिती मिळत असते. याच माहितीसाठी पोलीसही त्यांना योग्य परतावा देत असते. सण-उत्सवादरम्यान खबऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यकतेकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अनेकदा छोटा-मोठा मटका किंवा जुगार अड्डा चालवण्याची खबऱ्यांना पोलिसांची मूक सहमती असते. त्यामुळेच खबरे आपल्या जीवावर उदार होऊन गुन्हेगारी जगताची माहिती मिळवित असतात. परंतु मागील काही दिवसांपासून खबऱ्यांचा अभाव आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्पर्धेमुळे परिस्थिती खराब झाली आहे. पोलीस ठाण्यातील डीबी (डिटेक्शन) ची वेगवेगळी चमू असते. तपासात यश मिळविण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा असते. अशा वेळी एखाद्या खबऱ्याने एका चमूला माहिती दिली तर दुसरी चमू नाराज होते. यातूनच खबऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. एकीकडे पोलीस कारवाई होत आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारांकडूनही त्यांना धोका आहे. त्यामुळे खबरे मागील काही दिवसांपासून शांत बसले आहेत.म्हणून माहिती मिळाली नाही नागपूर : गेल्या ९ सप्टेंबर रोजी खंडणी वसुलीवरून सक्करदरा येथील बुधवार बाजारात कुख्यात गुन्हेगार आशिष राऊत मारला गेला. तो दीड महिन्यापूर्वीच तुरुंगातून सुटला. तेव्हापासून तो या परिसरात दहशत पसरवत होता. बुधवार बाजारात पोलिसांची नेहमी गस्त असते. परंतु खबऱ्यांचे नेटवर्क नसल्याने पोलिसांना दीड महिन्यांपासून सुरूअसलेल्या या प्रकरणाची माहितीच मिळाली नाही.