शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश नाही

By admin | Updated: June 6, 2017 22:33 IST

लष्करीबागेत रविवारी रात्री झालेल्या मोहम्मद आबिद जिमल अन्सारी (वय २४) याच्या हत्याकांडातील फरार आरोपींचा छडा लावण्यात

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 6 -  लष्करीबागेत रविवारी रात्री झालेल्या मोहम्मद आबिद जिमल अन्सारी (वय २४)  याच्या हत्याकांडातील फरार आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी कधी मौनीबाबाची भूमिका वठवितात. तर, कधी ठरवून ठेवल्याप्रमाणे पोलिसांना माहिती देत असल्याने प्रकरणाचा तपास पुढे सरकलेला नाही. 
नेतागिरीचे पांघरून घेऊन गुन्हेगारीत सक्रीय असलेला सामी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख याने आपल्या ८ ते १० सशस्त्र साथीदारांच्या मदतीने रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास डोबीनगरातील मोहम्मद आबिद जिमल अन्सारी याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली होती. आबिद हा उत्तर नागपुरातील खतरनाक ईप्पा-नौशाद टोळीतील गुंड होता. या टोळीचा आरोपी गुड्डू ऊर्फ आसिफ शेख हा प्रतिस्पर्धी आहे.  याने उत्तर नागपुरातील अवैध धंदे आणि खंडणी वसुलीसह लाखोंच्या भूखंडांवर, जमिनीवर कब्जा करण्यासाठी या दोन्ही टोळळ्या सक्रिय आहेत. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते एकमेकांच्या कारवायांमध्ये हस्तक्षेप करतात. त्यातून त्यांच्यातील वाद तीव्र झाला असून या वादातूनच  रविवारी  रात्री ७.३० च्या सुमारास गुंडांच्या या दोन परस्पर विरोधी टोळ्या  नवा नकाशा परिसरात किदवई ग्राऊंडजवळ  समोरासमोर आल्या. त्यांनी  जोरदार सशस्त्र हाणामारी केली. यावेळी आसिफने पिस्तूल काढले आणि आबिदच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्लयात आसिफचा साथीदार कोयला उर्फ आसिफ काल्या आणि समीरसुद्धा जखमी झाला. काल्याच्या हाताला तर, सामीच्या पायाला गोळीची जखम झाली. या गोळळ्या आबिदच्या साथीदारांनी झाडल्याचा त्यांनी आरोप लावला आहे. मात्र, बंदुकीच्या गोळळ्या दोघांनाही चाटून गेल्यासारख्या दिसत असल्याने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना अडकवण्यासाठी स्वत:च स्वत:ला मारल्या असाव्या, असा संशय आहे. त्यांची जखम जुजबी आहे. दरम्यान, आसिफ, कोयला आणि समीर या तिघांची ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी असून, त्यांच्याकडून फरार साथीदारांची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोललिसांना हवी असलेली माहिती आरोपी देत नाही. 
 सेठची भूमिका संशयास्पद -
गुन्हेगारांचा आश्रयदाता, अन् मांडवलीकार म्हणून गुन्हेगारी वर्तुळात ओळखला जाणारा कामठीचा सेठ या प्रकरणात संशयास्पद भूमीका वठवित आहे. आबिदच्या हत्याकांडानंतर आरोपी त्याच्याकडेच गेले होते. त्याने दिलेल्या दिशानिर्देशानंतर ते विशिष्ट ठिकाणी निघून गेले. पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी कामठीत गेले होते. मात्र, त्यांनी सेठची काय चौकशी केली ते कळायला मार्ग नाही.
 
आरोपींवर मोक्का लागणार-
हे हत्याकांड संघटीत गुन्हेगारीचा भाग आहे. त्यातून आपल्या टोळीची दहशत आसिफला तयार करायची आहे, हे जवळपास स्पष्ट झाल्यामुळे पोलीस फरार आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्याच्या तयारीत आहे. तसे संकेत सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यासंबंधाने आवश्यक पुराव्याची साखळी जोडण्याचे काम सुरू असल्याचेही सहआयुक्त बोडखे यांनी सांगितले आहे.