शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पीडित महिला-मुलींना पोलिसांचा भरोसा

By admin | Updated: January 2, 2017 02:39 IST

हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी ‘भरोसा सेल’मधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे.

महाराष्ट्रातील पहिला उपक्रम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : राज्यात सर्वत्र सुरू करणार ‘भरोसा सेल’ नागपूर : हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी ‘भरोसा सेल’मधून मानसिक बळ प्राप्त होईल, असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही ‘भरोसा सेल’ची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले. हैदराबादच्या धर्तीवर शहर पोलिसांनी राज्यातील पहिलेवहिले ‘भरोसा सेल’ नागपुरातील सुभाषनगर टी-पॉर्इंटजवळ सुरू केले. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, विभागीय आयुक्त अनुप कुमार, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त पाटणकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रंजन कुमार शर्मा तसेच अनेक गणमान्य उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानामुळे हिंसेचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या बळावरच आम्ही पीडितांना न्याय देऊन गुन्हेगारी नियंत्रित करू शकतो. त्यातून कायद्याचा धाक निर्माण करू शकतो. पोलीस जनतेच्या मदतीकरिता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असे सांगतानाच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करताना येथे आपल्याला न्याय मिळेल, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होण्याची गरजही त्यांनी विशद केली. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडणारच नाही, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. भरोसा सेलच्या निर्मितीमागे हाच उद्देश आहे. नागपूर आयुक्तालय आणि जिल्हा मुख्यालयामार्फत अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आले आहेत. सीसीटीएनएस, डिजिटल ठाणी, सीसीटीव्ही यासारखे उपक्रम पथदर्शी आहते. प्रशासनाच्या वतीने नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करताना उच्च तंत्रज्ञानावर भर देण्यात येईल. पोलिसांच्या निवास व्यवस्थेबाबतही शासन अनुकूल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कायद्याचा आदर आणि धाक असणे आवश्यक आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच कोणत्याही तक्रारीवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडवून आणण्यावर भर द्यावा. आधी समेट आणि नंतर कायदा हे धोरण पोलिसांनी ठेवावे, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी) २४ बाय ७ सेवा अनेक प्रकरणांत पीडित महिलांना कुठे न्याय मागावा, हेच समजत नाही. न्यायासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते. घरगुती हिंसाचार आणि हुंडाविरोधी प्रकरणात अनेकदा पीडितेचे वेळीच समुपदेशन न झाल्यास संसार विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. कुणाच्या सुखी संसाराला तडा जाऊ नये, यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे भरोसा सेलमध्ये समुदेशन करण्यात येईल. त्यांचे समाधान न झाल्यास शेवटी गुन्हा दाखल करण्यात येईल. भरोसा सेलमध्ये पीडित महिलेला विधिविषयक, मानसोपचार, वैद्यकीय मदत एकाच ठिकाणी मिळेल. यातून त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन महिलांना न्याय मिळण्यास मदत होईल. २४ तासात तीन पाळ्यांमध्ये या सेलचा कारभार सुरू राहील. रात्री-बेरात्री कुणी पीडित महिला-मुलगी आल्यास आणि गरज भासल्याच तिच्या राहण्याची व्यवस्थादेखील करण्यात येईल, अशी ग्वाही भरोसा सेलची संकल्पना स्पष्ट करताना पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी नोंदवून घेतली पहिली तक्रार भरोसा सेलच्या माध्यमातून महिला अत्याचार रोखण्यासाठी १०९१ क्रमांकाची हेल्पलाईन आहे. १०० क्रमांकावर फोनवरून तक्रारी स्वीकारून संबंधितांकडे पाठविण्यात येईल. पीडित महिलेच्या तक्रारीचे वर्गीकरण करून त्यांना ज्या प्रकारची सेवा आवश्यक आहे, ती उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष म्हणजे, आज उद्घाटनाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्ता नामक महिलेची पहिली तक्रार स्वत: नोंदवून घेतली.