शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

‘डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट’ करून भूखंड विक्रेते मोकळे

By admin | Updated: February 20, 2015 02:17 IST

मेट्रोरिजनमधील ले-आऊट मंजूर करण्यासाठी नासुप्रने घातलेल्या अटींमध्ये विकासकांनी (डेव्हलपर्स) पळवाट शोधली आहे.

लोकमत विशेषनागपूर : मेट्रोरिजनमधील ले-आऊट मंजूर करण्यासाठी नासुप्रने घातलेल्या अटींमध्ये विकासकांनी (डेव्हलपर्स) पळवाट शोधली आहे. आम्ही स्वर्खाने ले-आऊट विकसित करू, असे ‘डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट’करून विकसक ले-आऊट मंजूर करून घेत आहेत. एकदा ले-आऊटला मंजुरी मिळाली की झटपट भूखंडांची विक्री करण्याचा धंदा जोरात सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात नासुप्रशी केलेल्या करारानुसार विकास कामे करण्याकडे विकासकांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. यामुळे भविष्यात मंजूर ले-आऊटमध्येही भूखंड खरेदी करणाऱ्यांचे भूखंड रिलीज होणार नाहीत व त्यांना बांधकामाची परवानगी मिळणार नाही. यामुळे असे भूखंड खरेदी करण्यांची डोकेदुखी वाढणार आहे. मेट्रोरिजन अंतर्गत कोणतेही ले-आऊट मंजूर करताना विकासकाला (डेव्हलपर्स) नासुप्रशी करार करावा लागतो. असा करार करण्यासाठी दोन पर्याय असून कोणता पर्याय निवडायचा याचे स्वातंत्र्य विकासकाला देण्यात आले आहे. पहिल्या पर्यायानुसार ले-आऊटच्या एकूण क्षेत्रफळानुसार आवश्यक असलेले रस्ते, गडर लाईन, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या, पिण्याच्या पाण्याची लाईन, ले-आऊटमधील खेळाच्या मैदानांना (ओपन स्पेस) सुरक्षा भिंत बांधणे यासाठी येणारा वास्तविक खर्च विकासकाने नासुप्रकडे जमा करावा व संपूर्ण ले-आऊटमधील भूखंडांचे रिलीज लेटर (आरएल) घ्यावे. विकासकामे जमा केलेल्या निधीतून नासुप्र स्वत: ही सर्व कामे करेल. दुसरा पर्याय असा आहे की, वरील संबंधित सर्व विकास कामे स्वखर्चाने केली जातील व जसजशी विकासकामे होतील त्या प्रमाणात संबंधित ले-आऊटमधील भूखंड रिलीज केले जातील, असा करारनामा (डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट) डेव्हलपर्सने नासुप्रशी करावा. हा दुसरा पर्याय डेव्हलपर्ससाठी सोयीचा आहे. कारण, या पर्यायात डेव्हलपर्सला नासुप्रकडे विकास शुल्क जमा करावे लागत नाही. डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंट करून डेव्ललर्स मोकळे होतात व ले-आऊट मंजूर करून घेतात. एकदा ले-आऊट मंजूर झाले की भूखंडांची विक्री सुरू केली जाते. पण प्रत्यक्षात या डेव्हलपमेंट अ‍ॅग्रीमेंटची माहिती नागरिकांना दिलीच जात नाही. येथेच त्यांची फसगत होते. डेव्हलपेंट अ‍ॅग्रीमेंटच्या भरवशावर ले-आऊटला मंजुरी मिळवून घेणारे डेव्हलपर्स भूखंड विकून मोकळे होतील. पण, खरेदी केलेले भूखंड नियमित होणार नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेले विकास शुल्क डेव्हलपर्स भरेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांना घर बांधण्यासाठी नासुप्रकडून अधिकृत परवानगी मिळणार नाही. भूखंड खरेदी करणाऱ्यांनाच मनस्ताप सहन करावा लागेल. त्यामुळे डेव्हलपर्सने विकास कामे केल्याशिवाय भूखंड खरेदी न करणे हा उत्तम पर्याय आहे. अज्ञानापोटी असा भूखंड खरेदी केला असेल तर किमान डेव्हलपर्सने विकास कामे करण्यापूर्वी त्याच्याकडे विकास शुल्क जमा करू नका. (प्रतिनिधी)