शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सराफा दुकान लुटण्याचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सराफा दुकान फोडून ऐवज लुटण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र गुंडांना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सराफा दुकान फोडून ऐवज लुटण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र गुंडांना यशोधरानगर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यांचे दोन साथीदार मात्र अंधाराचा लाभ उठवत पळवून गेले. महेश ऊर्फ सोनू राजकुमार कुसेरे (वय २४, रा. बारानल चाैक), हिमांशु मोहन सोरते (वय २०, रा. कांजीहाऊस चाैक), रूपेश ऊर्फ नव्वा धनराज येनुरकर (वय २४, रा. कुंदनलाल गुप्तानगर) आणि राहुल राजू हटेवार (वय २०, रा. कुंदनलाल गुप्तानगर), अशी आरोपींची नावे आहेत.

यशोधरानगरचे पोलीस पथक शनिवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना रविवारी पहाटे २ च्या सुमारास यादवनगरातील स्वीपर कॉलनीजवळच्या वाचनालयाशेजारी काही सशस्त्र गुन्हेगार दडून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे त्यांना गराडा घातला. यातील उपरोक्त चार गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. अंधाराचा फायदा घेऊन दोघे मात्र पळून गेले. पकडलेल्या गुन्हेगारांकडून पोलिसांनी दोन तलवारी, एक चाकू, मिरची पूड, चार मोबाईल आणि पल्सर असा एकूण १ लाख १७ हजाराचा ऐवज जप्त केला. त्यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मोठा गुन्हा टळला

रविवारी सकाळी अटकेतील आरोपींची ठाणेदार अशोक मेश्राम यांनी चाैकशी केली असता, त्यांनी यादवनगरातील साैरभ ज्वेलर्स हे सराफा दुकान लुटण्याच्या इराद्याने तेथे जमलो होतो, अशी कबुली दिली. पोलिसांनी वेळीच त्यांना जेरबंद केल्यामुळे मोठा गुन्हा टळला. त्यांनी यापूर्वी आणखी कोणते गुन्हे केले, त्याची आता पोलीस चाैकशी करीत आहेत.

परिमंडळ - ५ चे उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव, उपनिरीक्षक नसिमुन शेख, एएसआय प्रकाश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

---