शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पितृपंधरवड्यात मेथी, ढेमस खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून ...

नागपूर : गेल्या तीन आठवड्यांपासून येणाऱ्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले असून गृहिणींचा स्वयंपाकघरातील खर्च वाढला आहे. रविवारी होलसेल बाजारात मेथीचे भाव १०० रुपयांवर तर किरकोळमध्ये १३० ते १४० रुपये किलो भाव होते. तसेच ढेमस होलसेलच्या ४० रुपयांच्या तुलनेत किरकोळमध्ये ६० रुपये भाव होते. याशिवाय पालक आणि अन्य भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. रविवारी किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलोचे वांगे ६० रुपयांवर तर कोथिंबीरचे भाव १०० रुपयांवर पोहाेचले होते. पितृपंधरवड्यात सर्वच भाज्या भाव खात आहेत. गृहिणी भाज्या खरेदीकडे कानाडोळा करून स्वयंपाकघरात कडधान्याचा उपयोग करीत आहेत.

बाजारात पत्ता कोबी ४० तर फूल कोबीचे भाव ६० रुपयांवर पोहोचले आहेत. पावसामुळे शेतातच भाज्या खराब झाल्या आहेत. भाज्यांची तोडणी करणे शक्य नसल्याने पालेभाज्या शेतातच खराब होत आहेत. वांगी तोडणी थांबली आहे. वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडून कमी तर नाशिक येथून मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. बाजारात वांगी स्थानिक शेतकऱ्यांकडूनच विक्रीसाठी येतात. पण पावसामुळे शेतकऱ्यांवर बंधन आले आहे. किरकोळमध्ये सर्व भाज्या प्रति किलो ४० रुपयांवर पोहोचल्या आहेत. होलसेल बाजारातही भाज्यांचे भाव वाढल्याची माहिती महात्मा फुले सब्जी व फ्रूट मार्केट (कॉटन मार्केट) असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी दिली.

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपालाबाजारातील दर घराजवळ

वांगी४०-५० ६०

कोथिंबीर७०-८० १००

हिरवी मिरची २५ ४०

टोमॅटो१२-१५ ३०

कारले३०-४० ६०

चवळी शेंग २५-३० ४०

गवार शेंग ४० ६०

पत्ता कोबी २० ४०

फूल कोबी ४० ६०

कोहळ २५ ४०

लवकी १५ ३०

पालक३०-४० ६०

मेथी १०० १४०

सिमला मिरची २५-३० ४०

तोंडले २५ ४०

दोडके ४० ६०

बीन्स ८० १००

काकडी१५-२० ३०

मुळा २० ३०

गाजर२५-३० ४०

बटाटे१२-१५ ३०

पुरवठा कमी; मागणी वाढली

गेल्या काही दिवसांपासून होलसेल बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी असून तुलनेत किरकोळमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव अचानक वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणांमध्येही भाज्यांचे भाव जास्तच होते. नवीन भाज्यांची आवक ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात होणार असून तोपर्यंत गृहिणींना जास्त भावातच भाज्या खरेदी कराव्या लागतील.