शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडांकडून पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर नागपुरातील गुंडांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. मेयो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्तर नागपुरातील गुंडांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. मेयो चाैकाजवळ गुरुवारी पहाटे २च्या सुमारास तहसील पोलिसांनी ही कारवाई केली.

नयन मनोज लोखंडे (वय २१, रा. लष्करीबाग), परवेज अली ऊर्फ सोनू करामत अली (वय २७, रा.न्यू म्हाडा क्वॉर्टर, कपिलनगर) आणि शेख सलमान शेख कलिम (वय ३०, रा. सम्राटनगर) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार, हल्ला असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांनी ओली पार्टी केली आणि दारूच्या नशेत तर्र असलेले हे गुंड नंतर मोठा गुन्हा करण्याच्या उद्देशाने सेंट्रल एव्हेन्यूकडे निघाले. मेयो चाैकात गस्तीवर असलेल्या तहसील पोलिसांच्या पथकाला ते दिसले. त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना कारमधून खाली उतरवून त्यांची झडती घेतली असता आरोपी परवेजकडे मॅगझिन असलेले पिस्तूल आढळले. हे पिस्तूल, चार फोन आणि कार (एमएच ३१- सीएन २७३) असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय आहे. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, ठाणेदार जयेश भांडारकर, पीएसआय एस. एस. मस्के, नायक पंकज सुरजुसे, नायक दामोदर, अतुल आणि वैभव यांनी ही कामगिरी बजावली.

----