शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रंजित सफेलकरकडून पिस्तूल जप्त

By admin | Updated: June 10, 2016 02:49 IST

अनेक वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित असलेला कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष रंजित सफेलकर याच्या वाहनातून जुनी कामठी पोलिसांनी पिस्तूल,

जिवंत काडतुसे सापडली : परवानाही बनावटनागपूर : अनेक वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित असलेला कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष रंजित सफेलकर याच्या वाहनातून जुनी कामठी पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतूसे आणि बनावट मुद्रांक जप्त केला. पिस्तुलाचा परवाना बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सफेलकरविरुद्ध हत्यार कायद्यासोबतच फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सफेलकर कामठी नगर परिषदेचा उपाध्यक्ष असून, त्याची पत्नी मीना यासुद्धा नगरसेविका आहेत. सफेलकर श्रीराम सेनेचाही पदाधिकारी आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, अनेक गंभीर आणि वादग्रस्त प्रकरणात सफेलकरचे नाव जुळले आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावर नेहमीच नजर ठेवून असतात. २६ मेच्या मध्यरात्री जुनी कामठी पोलिसांच्या पथकाने संशयावरून सफेलकरच्या वाहनाची झडती घेतली. त्यात पोलिसांना एक पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे आणि मुद्रांक (स्टॅम्प पेपर) आढळला. ही बाब कळताच ठाणेदार जयेश भंडारकर यांनी सफेलकरकडे पिस्तुलाच्या परवान्याबाबत चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना परवाना दाखविला, तो मोहत्तीपूर, पो.स्टे. गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील होता. सफेलकर कामठीत राहतो आणि त्याला गोरखपूर प्रशासनाने पिस्तुलाचा परवाना कसा दिला, असा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्याला त्यावेळी विचारपूस केली अन् सोडून दिले. या परवान्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर जुनी कामठी पोलीस ठाण्याचे एक पथक चौकशीसाठी गोरखपूरला पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांनी केली पोलखोलपोलीस पथकाने सफेलकरच्या पिस्तूल परवान्याबाबत गोरखपूरच्या जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केली. त्यांना जप्त केलेली कागदपत्रे (परवाना, मुद्रांक) दाखविली. दरम्यान, सफेलकरच्या नावाने असा परवानाच देण्यात आला नाही आणि त्याने दाखवलेला परवाना बनावट असल्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी गोरखपूर यांनी पोलीस आयुक्तालयाच्या नावे दिले. हे प्रमाणपत्र घेऊन जुनी कामठीचे पोलीस पथक आज परतले. या अहवालाची माहिती ठाणेदार भंडारकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठांकडून मिळालेल्या निर्देशानुसार, सफेलकरविरुद्ध अवैध शस्त्र बाळगण्याच्या तसेच बनावट कागदपत्रे (परवाना, मुद्रांक) सादर करून फसवणूक करण्याच्या आरोपाखाली गुरुवारी गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची माहिती कळताच राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली. दरम्यान, पोलीस पथकाने सफेलकरच्या घरी चौकशी केली तेव्हा तो आढळला नाही. तो फरार असून, आम्ही त्याची चौकशी करीत असल्याचे ठाणेदार भंडारकर यांनी पत्रकारांना सांगितले.