शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार गुंडाकडून पिस्तुल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:07 IST

::::::::::::::::::::::::::::::::::::::::: कुख्यात वसीम दाेसा हद्दपार नागपूर : माेमीनपुरा येथील कुख्यात गुंड वसीम अनवर ऊर्फ वसीम दाेसा याला दाेन वर्षासाठी ...

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

कुख्यात वसीम दाेसा हद्दपार

नागपूर : माेमीनपुरा येथील कुख्यात गुंड वसीम अनवर ऊर्फ वसीम दाेसा याला दाेन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. हैदरी राेड निवासी वसीम दाेसाविरुद्ध हल्ला करणे, मारझाेड, दराेड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. या परिसरात दहशत आहे. ही बाब लक्षात घेता झाेन तीनचे डीसीपी लाेहित मतानी यांनी आराेपीला दाेन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश काढले. त्याला भंडारा येथे नातेवाईकांकडे साेडण्यात आले.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा

नागपूर : फ्लॅटची विक्री करून फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविराेधात काेतवाली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिलीप ढाेबळे व त्याची पत्नी गुंजन ढाेबळे अशी आराेपींची नावे असून ते बिडीपेठ येथील रहिवासी आहेत. या दाम्पत्याने अपार्टमेंटचे बांधकाम करून दक्षिणामूर्ती चाैक, महाल येथील रहिवासी लालचंद राठी यांच्याशी फ्लॅट विक्रीचा साैदा केला. राठी यांनी आराेपींना २१.२५ लाख रुपये दिले. मात्र आराेपींनी ताे फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला विकून राठी यांची फसवणूक केली. काेतवाली पाेलिसांनी फसवणूक व गुन्हेगारी षडयंत्र रचण्याचे प्रकरण दाखल केले.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

पेट्रोल पंपच्या गार्डवर हल्ला

नागपूर : बस चालकाने एसटी स्टॅंडच्या पेट्राेल पंपावर काम करणाऱ्या चाैकीदाराला राॅडने वार करून जखमी केले. दिलीप बावनकुळे हा एसटी स्टॅंडच्या पेट्राेल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करताे. बुधवारी सकाळी बसेसची गर्दी असल्याने सर्व चालकांना रांगेत राहण्याची सूचना त्याने दिली. यादरम्यान आलेल्या अजहर निजामुद्दीन यालाही बस रांगेत लावण्याची सूचना केली. मात्र यावरून वाद झाला व चालक अजहरने राॅडने चाैकीदारावर हल्ला केला. गणेशपेठ पाेलिसांनी हल्ल्याचे प्रकरण दाखल केले.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

चाेरट्यांनी चाेरली कार

नागपूर : कामठीमध्ये अज्ञान चाेरट्यांनी एका घरातून राेख रक्कम व सामानासह कारही चाेरून नेली. कल्पतरु काॅलनी निवासी अब्दुल कादिर हे ११ जुलैला बाहेर गेले हाेते. चाेरट्यांनी घराचे टाळे ताेडून घरातून १० हजार रुपये व काही सामान चाेरले. त्यांच्या घरी अपेक्षेप्रमाणे राेख न मिळाल्याने चाेरट्यांनी त्यांनी एमएच-४०, बीई-६४९४ क्रमांकाची कार नेली. न्यू कामठी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरूद्ध चाेरीचा गुन्हा दाखल केला.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::

भिंतीत दबल्याने वृद्धेचा मृत्यू

नागपूर : अजनी पाेलीस स्टेशन अंतर्गत रामटेकेनगर येथील एका वृद्ध महिलेचा भिंतीखाली दबल्याने मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव अंजिरा किसन शेंडे (९१) असे आहे. मंगळवारी शेजारी राहणाऱ्या प्रभा बांगरेग यांच्या घराची भिंत टीनाच्या शेडवर पडली. यामध्ये दबून अंजिरा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले.