खापा : राज्य शासनाच्या स्मार्ट काॅटन प्रकल्पांतर्गत नंदापूर (ता. सावनेर) येथे कृषी विभागाच्या वतीने कपाशीवरील गुलाबी बाेंडअळी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
यावेळी शेतकऱ्यांना पहिल्या दाेन वेेचणीच्या कापसाचे जिनिंग करणे, रुईच्या गाठी तयार करून त्यांची विक्री करणे, शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या कापसाला अधिक भाव मिळवून देणे, कपाशीवरील शत्रू व मित्र किडींची ओळख, रासायनिक खतांचा प्रमाणबद्ध वापर, जमीन आराेग्य पत्रिकेनुसार खतांचा व इतर आवश्यक अन्नद्रव्यांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, गुलाबी बाेंडअळीसह अन्य किडींचे व राेगांचे तसेच पाण्याचे व्यवस्थापन, फेराेमन ट्रॅप, निंबोळी अर्क व ट्रायकोकार्डचा वापर या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी अश्विनी काेरे, पंचायत समिती उपसभापती प्रकाश पराते, पंचायत समिती सदस्य गणेश काकडे, सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंता चौधरी, नंदापूरचे सरपंच मनोज बन्सोड, मंडळ कृषी अधिकारी एस. ए. राठोड, रोशन डंभारे, कृषी सहायक स्वाती सुरकार उपस्थित हाेते. कार्यक्रमाला अशोक मुरकुटे, गंगाधर वानखेडे, आनंद चौधरी, तुळशीदास पाटील, गंगाधर पाटील, मयूर चटप, प्रफुल्ल मुरकुटे, अनिल येलेकार, दिवाकर ढोके, स्वप्निल फुलझडे, नीलेश नागपूरकर, धोंडबा मोजनकर यांच्यासह शेतकऱ्यांनी हजेरी लावली हाेती.
200821\img-20210820-wa0162.jpg
नंदापुर येथे कपाशीवरील गुलाबी बोंड अळी कार्यशाळा संपन्न