शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिली नदी डम्पिंग यार्डमध्ये परिवर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

नागपूर : प्रशासन पिली नदीच्या साफसफाईसंदर्भात उदासीन आहे. त्यामुळे पिली नदी डम्पिंग यार्डमध्ये परिवर्तित होत आहे. वनदेवीनगर पूल ...

नागपूर : प्रशासन पिली नदीच्या साफसफाईसंदर्भात उदासीन आहे. त्यामुळे पिली नदी डम्पिंग यार्डमध्ये परिवर्तित होत आहे.

वनदेवीनगर पूल परिसरात या नदीमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मृत जनावरे अनेक दिवसांपासून पडली आहेत. त्यांची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. डासांचा प्रकोपही वाढला आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, प्रशासन याविषयी गंभीर नाही. पिली नदीची सफाई करण्यासाठी नगरसेवक व आमदाराला अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु, कुणीही धावून आले नाही. पिली नदी दिवसेंदिवस घाण होत आहे.

---------------

प्लांटसाठी पाणी थांबवतात

स्थानिक नागरिक अज्जू खान, रियाज शेख, इश्तियाक अन्सारी, जावेदभाई, जहीर अन्सारी, सलीम अन्सारी, इम्रान खान आदींनी दिलेल्या माहितीनुसार, नदीच्या काठावरील एका प्लांटसाठी पाणी थांबवले जाते. त्यामुळे नदीच कचरा साचतो. प्रशासन नदीची सफाई करीत नाही. परिणामी, पाणी दूषित झाले आहे. ही नदी हळुहळु नाल्याचे स्वरुप धारण करीत आहे. नदीत मृत कुत्रे, डुकरे इत्यादी जनावरे पडली आहेत. त्यांची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.

-----------------

सफाई झाली आहे

वनदेवीनगर पुलाजवळ नदीची नियमित सफाई केली जाते. १५ दिवसांपूर्वी पोकलॅण्ड मशीनने नदीची सफाई करण्यात आली. येत्या शुक्रवारीही वनदेवीनगर परिसरातील नदीचे निरीक्षण करून आवश्यक सफाई केली जाईल.

-- गोपी कुमरेल, नगरसेवक.