शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाच्या खाटेवर अजगराची पिले !

By admin | Updated: June 11, 2016 03:10 IST

कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेत राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले.

नागपूर : कामगार रुग्णांच्या उपचाराला घेऊन नेहमीच चर्चेत राहणाारे विमा रुग्णालय शुक्रवारी वेगळ्याच घटनेने चर्चेत आले. या रुग्णालयात चक्क रुग्णांच्या खाटेवर अजगराची पिले आढळून आली. ही पिले पकडल्याजाईपर्यंत रुग्णांसह डॉक्टर, कर्मचारी व परिचारिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, या घटनेला घेऊन येथील रुग्ण किती सुरक्षित आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. या विभागात खाटेवर रुग्णांऐवजी दीड ते दोन फुटाची दोन अजगराची पिले वळवळताना एका परिचारिकेच्या नजरेस पडली. तिने लागलीच आरडाओरड केली. डॉक्टरांसह, कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका कर्मचाऱ्याने सर्पमित्राला फोन करून बोलवून घेतले. सर्पमित्राने अत्यंत शिताफीने अजगराच्या दोन्ही पिल्लांना पकडून डबाबंद केले. सुदैवाने खाटांवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली.यापूर्वी निघाला होता साप नागपूर : यापूर्वी रुग्णालय परिसरात विषारी साप निघाल्याची माहिती आहे. रुग्णालय परिसरात साप निघणे हे नेहमीचे झाले असले तरी अधिकारी लक्ष देत नसल्याचे येथील कर्मचारी सांगतात. विशेष म्हणजे, रात्रपाळीतील कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक रात्रीला तळमजल्यावर झोपतात. यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पकडलेली दोन पिले ही सापाची नसून, अजगराची असल्याचे सर्पमित्राने सांगितले. रुग्ण धोक्यातरुग्णालय परिसर झाडा-झुडपांनी वेढला आहे. कचऱ्याचा ढीगही साचलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षा भिंतीचे बांधकाम थंडबस्त्यात पडले होते ते आता सुरू झाले आहे. रुग्णालयाची दारे व खिडक्या जुनाट असून खिळखिळ्या झाल्या आहेत. मांजरीपासून कुत्र्याची पिले सहज रुग्णालयात प्रवेश करतात. आता अजगराची पिलेही येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. याला घेऊन रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)