शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: February 14, 2017 02:19 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

बुद्ध महोत्सव : चीनचे भदंत रेन दा यांच्या हस्ते २२ ला उद्घाटन नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारीदरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात भारतीय लोकनृत्यासह चिनी गीत, संगीत व नृत्याची मेजवानी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागार्जुन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई), बोशान झेंगझुऐ टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्टिव्हज आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चीनमधील भदंत, रेन दा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्मचारी लोकमित्र आणि डॉ. यो (तायवान) हे प्रमुख पाहुणे राहतील. यानंतर २३ ते २६ पर्यंत रत्नमाला व्याख्यानमाला होईल. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले तीन गुरू यांच्यावर व्याख्यान होईल. पहिल्या दिवशी संत कबीर यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत कंवल भारती, क्रांतिसूर्य ज्योतीबा फुले यांच्यावर सुशीला मोराले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्यावर धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे मार्गदर्शन करतील. २३ ला विविध राज्य व स्थानिक कलाकार लोकनृत्य व कला सादर करतील. २४ ला महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गझलांचा कार्यक्रम होईल. डॉ. संजय मोहोड आणि त्यांची चमू हा कार्यक्रम सादर करतील. २५ ला चान टी म्युझीकल हा चिनी कलाकारांची विशेष प्रस्तुती असलेला कार्यक्रम सादर केला जाईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता समारोप होईल. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम हे प्रमुख अतिथी राहतील. याशिवाय २५ ला युवकांसाठी कार्यशाळा होईल. २६ ला बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम तसेच धम्मचारी नागकेतू यांची ध्यान कार्यशाळा होईल. या महोत्सवाला येणाऱ्या रसिकांसाठी फुड झोन, किड्स झोन, बुक्स आणि आर्टिफक्ट स्टॉल सुद्धा राहतील. (प्रतिनिधी)फिल्म फेस्टिव्हल व कला प्रदर्शन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिल्म फेस्टिव्हल व कला प्रदर्शन हे आहे. नॅशनल फिल्म आर्टिव्हज आॅफ इंडियाद्वारा पुरस्कृत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वृत्तचित्र व फिल्म दाखविण्यात येतील. याशिवाय प्रख्यात चीन व भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. या कलावंतांशी संवाद सुद्धा साधता येईल.