शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएच.डी.’ करायचीय, तीन वर्षे सुटी घ्या

By admin | Updated: March 15, 2017 02:21 IST

संशोधनाचा दर्जा सुधारावा व ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांची नोंदणी व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नागपूर विद्यापीठ : संशोधनासाठी इच्छुक असलेले शिक्षक चिंताग्रस्त नागपूर : संशोधनाचा दर्जा सुधारावा व ‘पीएचडी’साठी दर्जेदार उमेदवारांची नोंदणी व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियम कडक केले आहेत. एखाद्या आस्थापनेत पूर्णकालीन कार्य करणाऱ्या व्यक्तीला ‘पीएचडी’ करायची असेल, तर तीन वर्षे शैक्षणिक रजेचे प्रमाणपत्र नोंदणीअगोदर सादर करावे लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. साधारणत: ‘पीएचडी’ करणाऱ्यांमध्ये शिक्षकांचेच प्रमाण अधिक असते. त्यामुळे या निर्णयामुळे ‘पीएचडी’ करण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर विद्यापीठातून अगदी सहज ‘पीएचडी’ होते असा समज होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’चा दर्जा सुधारण्यासाठी व योग्य उमेदवारांच्या चाळणीसाठी कठोर नियम लावले. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ४ मार्चपर्यंत ‘आरआरसी’च्या (रिसर्च अ‍ॅन्ड रिकग्निशन कमिटी) बैठकी चालल्या. त्यानंतर नव्या विद्यापीठ कायद्याची अधिसूचना निघाल्यामुळे तांत्रिक कारणांमुळे ‘आरआरसी’ पुढे ढकलण्यात आल्या. मात्र अगोदर झालेल्या ‘आरआरसी’ची नोंदणीपत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आली आणि अनेकांना धक्काच बसला. उमेदवारांनी व्यक्त केला रोष नवीन नियमांमुळे धक्का बसलेल्या उमेदवारांनी मंगळवारी कुलगुरूंची भेट घेतली. आम्ही नियमांनुसार ‘पेट’ दिली, व्यवस्थित ‘सिनॉप्सिस’ सादर केले व ‘आरआरसी’लादेखील आत्मविश्वासाने सामोरे गेलो. तेथेदेखील आम्हाला हिरवी झेंडी मिळाली. मात्र अचानकपणे सुट्यांची अट टाकून विद्यापीठाने आमची अडवणूकच केली आहे. अगोदर ही कल्पना उमेदवारांना का देण्यात आली नाही, असा सवाल उमेदवारांनी कुलगुरूंना केला.