नागपूर : रामझुल्याच्या बांधकामाला उशीर होत असून ऑक्टोबर २0१४ पर्यंंंत कार्याची प्रगती पाहिल्यानंतर विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशन (व्हीटीए) उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करण्याचा निर्णय घेणार आहे. व्हीटीएच्या पदाधिकार्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता पी.एम. लाहोरे, कार्यकारी अभियंता एस.जे. निकोसे, सहायक अभियंता डी.डी. काळे, राईट्सचे महाप्रबंधक एस.बी. चौधरी, एफ्कॉन्सचे प्रकल्प प्रमुख अरुण कुमार, योजना अभियंता पी. मेहरे यांची भेट घेऊन रामझुल्याच्या बांधकामात उशीर होत असल्याच्या बाबींवर विस्तृत चर्चा केली. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी रामझुल्याच्या उर्वरित कामाचा चार्ट लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. व्हीटीए अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, कंपनीने न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. त्यानुसार रामझुल्याचे संपूर्ण बांधकाम ३0 ऑक्टोबर २0१४ पर्यंंंत पूर्ण करावे आणि त्यानंतर दुसर्या टप्प्याचे बांधकाम सुरू करून ते १४ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने कंपनीला दिले होते. पण काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. एफ्कॉन्सचे अरुण कुमार यांनी सांगितले की, रामझुल्याच्या बांधकामाला काही तांत्रिक बाबींमुळे उशीर झाला. पण आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. अशा स्थितीत पहिल्या टप्प्याचे बांधकाम ऑगस्ट २0१४ पर्यंंंत पूर्ण होईल आणि त्यानंतर दुसर्या टप्प्याचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. तेसुद्धा १४ महिन्यात पूर्ण करण्यात होईल. एमएसआरडीसीने सहा पदरी केबल स्टड रेल्वे ओव्हरब्रीजचे (रामझुला) कंत्राट एफ्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. ला २५ जानेवारी २00६ रोजी दिले होते. बांधकाम ४२ महिन्यात पूर्ण होणार होते. परंतु आठ वर्षांंंनंतरही बरेचसे काम शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रामझुला लवकरच तयार होण्याची त्यांना अपेक्षा आहे. बैठकीत व्हीटीएचे उपाध्यक्ष रामकिशन ओझा, कोषाध्यक्ष पवन के. चोपडा, सहसचिव हेमंत त्रिवेदी, रोहित अग्रवाल, हेमंत सारडा, राहुल अग्रवाल उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्हीटीए हायकोर्टात याचिका दाखल करणार
By admin | Updated: June 2, 2014 02:19 IST