शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांकडून छळ होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरगुती कारणांवर होणारा महिलांचा छळ आणि तक्रारी, तसेच पुरुषांवर पोलिसांनी केलेली कारवाई हा नेहमीचाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती कारणांवर होणारा महिलांचा छळ आणि तक्रारी, तसेच पुरुषांवर पोलिसांनी केलेली कारवाई हा नेहमीचाच भाग आहे. मात्र, पत्नीच्या छळाविरुद्ध पुरुषांनी केलेल्या तक्रारीचीही नोंद भरोसा सेलमध्ये झालेली आहे. या तक्रारीचे प्रमाण चक्क १० टक्क्यांवर गेले आहे.

काेराेना काळात कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी असल्याने, कुटुंबातील संवादसुख वाढण्याची अपेक्षा होती. मात्र, झाले उलटे. घरात पुरुष राहू लागल्याने, तो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. पत्नीला मोकळेपणाने इकडे-तिकडे जात येत नसल्याने, संशयकल्लोळ वाढला आहे. यातूनच अनेक कुटुंबांत संवादाएवेजी वाद वाढल्याचे वास्तव पुढे आले आहे.

२०२० मध्ये भरोसा सेलकडे एकूण १,४३८ तक्रारी आल्या होत्या, तर १ जानेवारी ते १३ जूनपर्यंत ७८७ तक्रारी भरोसा सेलकडे आलेल्या आहेत. त्यात पत्नीकडून छळ होत असलेल्या पुरुषांनी नोंदविलेल्या तक्रारींची संख्या गेल्या वर्षी १५२ होती, तर आता ६ महिन्यांत हा आकडा ८० वर पोहोचला आहे.

---

रिकामटेकडे ऑर्डर

काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांचे काम बंद झाल्यामुळे. बाहेर विनाकारण पडले, तर कारवाईचा धाक असल्याने घरात राहण्याशिवाय पर्याय नसल्याने घराघरात पुरुष मंडळी पडून राहू लागली. त्यामुळे त्याच्या मागण्याही वाढल्या. नुसता घरात पडून राहतो अन् ऑर्डर सोडतो, अशी भावना झाल्याने महिला पाणउतारा करतात. स्वातंत्र्य संपल्याची तिची भावना झाल्याने पत्नी हेकडपणे वागते. त्याचमुळे ती टोमणे हाणते, अशी पुरुषांची भावना झाली असून, तसे अनेक पुरुषांच्या तक्रारीत नमूद आहे.

---

हस्तक्षेप वाढल्याची भावना

वारंवार चहा मागतो, आज हे कर, उद्या ते कर, हे का केले नाही, ते का केले नाही. तू घर स्वच्छ ठेवत नाही. मुलांवर रागावते. आईला वेळेवर जेवण देत नाही. माझ्यासमोर असे आहे, तर मागे कसे राहत असेल, असे पुरुष मंडळीकडून टोमणे हाणले जात असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे. तू सारखी मोबाइलमध्येच गुंतून राहते, घराकडे अजिबात लक्ष देत नसल्याची कुरबुर नवरा करत असल्यामुळे आणि सारखा हस्तक्षेप करत असल्यामुळे पतीसोबत तोंड वाजत असल्याचे महिलांच्या तक्रारीत नमूद आहे.

---

तक्रारीची संख्या

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२०

एकूण तक्रारी - १,४३८

महिलांच्या तक्रारी - १,२८६

पुरुषांच्या तक्रारी - १५२

---

१ जानेवारी ते १३ जून, २०२१

एकूण तक्रारी - ७९७

महिला - ७१७

पुरूष - ८०

---

((कोट))

पती-पत्नी विभक्त झाल्यास सर्वाधिक नुकसान मुलांचे होते. त्यांच्यावर भावनिक आघातही होतो. त्यामुळे कुणाचाही संसार तुटू नये, यासाठी आम्ही भरसक प्रयत्न करतो. मुलांच्या भविष्यावर होणारे परिणाम समोर ठेवून पती-पत्नीचे समुपदेशन करतो. त्यामुळे अनेक संसाराची विस्कटलेली घडी नीट करण्यात आम्ही यशस्वी होतो.

रेखा संकपाळ

सहायक पोलीस निरीक्षक भरोसा सेल प्रमूख, नागपूर.

---