शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी ‘नो पार्किंग’

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

शहरात येणारे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ...

विमानतळ ते राजभवन-रामगिरी : पोलिसांनी काढले आदेशनागपूर : शहरात येणारे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते रामगिरी आणि राजभवन दरम्यानपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कुठल्याही प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगवर पोलीस विभागातर्फे बंदी घालण्यात आली आहे. हे नो पार्किंग केवळ अधिवेशनापुरते मर्यादित नसून ते कायमस्वरूपी राहील हे विशेष. नागपूर शहरात वेगवेगळ्या कामानिमित्त अनेक महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती भेट देत असतात. या व्हीआयपी, व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांचे आवागमन हे मुख्यत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राजभवन आणि रामगिरी या दरम्यानच्या मार्गाने होत असते. हा मार्ग अतिवर्दळीचा असून रस्त्याच्या कडेला असलेले रहिवासी व वेगवेगळ्या आस्थापनाचे मालक, कर्मचारीवर्ग व ग्राहक हे त्यांची वाहने मुख्य मार्गावर उभी करतात. वास्तविक ‘दि रुल्स आॅफ रोड रेग्युलेशन १९८९ मधील १५(२) अन्वये रस्त्यावर वाहने उभी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार वारंवार कार्यवाही करूनही बरीच वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. त्यामुळे अतिमहत्त्वाचे व महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहन ताफ्यास तसेच सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो. या बाबींचे गंभीर्य लक्षात घेऊन मार्गावरील वाहतूक व्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतूक नियमन करण्याच्या दृष्टीने सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोट कलम (१), (ब),(२),(६) अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राजभवन व रामगिरी दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहनांच्या पार्किंगवर कायमस्वरूपी बंदी घातली आहे. (प्रतिनिधी)