शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बाधितांचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST

सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या ...

सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या ४५२२ चाचण्यांपैकी १४६ (३.२२ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४१,५७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३५,६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २२७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२९० इतकी आहे. शुक्रवारी ७२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सावनेर तालुक्यात आठ रुग्णांची नोंद झाली. आठही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सावनेर शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. कुही तालुक्यात १४० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सावंगी येथे सहा, तर वेलतूर येथे एका रुग्णाची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात सात रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रातील पाच, तर ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात ४०३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी व भान्सुली येथे प्रत्येकी पाच, निलडोह (३), गुमगाव, हिंगणा व देवळी येथे प्रत्येकी दोन तर शिरूळ, नागलवाडी, मेटाउमरी, मांगली, टाकळघाट व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,८७१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ११,००७ कोरोनामुक्त झाले तर २७६ रुग्णांचा मृत्यू झाला.

रामटेक तालुक्यात पाच रुग्णांची नोंद झाली. पाचही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. रामटेक शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. तालुक्यात आतापर्यंत ६,५१० रुग्णाची नोंद झाली आहे. यातील ६,३०६ कोरोनामुक्त झाले तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०४ इतकी आहे.

काटोलला दिलासा

काटोल तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यात शुक्रवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.