शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

खेड्यात संक्रमणाचा टक्का वाढतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:09 IST

काटोल/सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/कुही/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शहरी भागातील संक्रमण आता गावागावात पोहोचत आहे. ...

काटोल/सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/कुही/रामटेक/नरखेड : नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शहरी भागातील संक्रमण आता गावागावात पोहोचत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गुरुवारी २८८ रुग्णांची नोंद झाली. लग्नसमारंभ आणि बाजारातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात न.प. प्रशासन अपयशी ठरल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

काटोल तालुक्यात गुरुवारी ३७ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल शहरातील २९ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. शहरात पंचवटी येथे सहा, जानकी नगर (५), राठी ले-आऊट, सरस्वतीनगर, रामदेवबाबा ले-आऊट येथे प्रत्येकी दोन तर हनुमान मंदिर, काळे ले-आऊट, नगर भवन, गॅस गोडाऊन, द्वारका नगरी, लक्ष्मीनगर, सतनाम ले-आऊट, नबिरा ले-आऊट, चांडकनगर, अनसूयापुरम, साठवणे ले-आऊट, आययुडीपी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये खानगाव येथे तीन, ढिवरवाडी येथे दोन तर घरतवाडा, मूर्ती, कोंढाळी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

सावनेर शहरातील विविध चाचणी केंद्रांवर गुरुवारी २५० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सावनेर शहरातील २१ तर केळवद, उमरी, बोरुजवाडा आणि नागपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात ३१ रुग्णांची पुन्हा भर पडली आहे. यात वानाडोंगरी (१३), डिगडोह (५), रायपूर (५), सावंगी देवळी (२) तर देवळी सावंगी, कवडस, नीलडोह, हिंगणा, अडेगाव, शिरुळ येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४,१६३ झाली आहे. यातील ४,००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नरखेड तालुक्यात गुरुवारी १३ रुग्णांची नोंद झाली. यात न.प. क्षेत्रातील ३ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८६ तर शहरात ४५ इतकी झाली आहे. गुरुवारी मेंढला येथे आठ तर जलालखेडा येथे दोन रुग्णाची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्यात आणखी १४ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात एक तर ग्रामीण भागातील तिष्टी येथे ६, धापेवाडा (५), बोरगाव बु. येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

---

मांढळ व वेलतूर येथेही संक्रमण

कारोनामुक्तीकडे वाटचाल करीत असलेल्या कुही तालुक्यात संक्रमणाचा वेग वाढताना दिसतो आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करण्यात आलेल्या चाचण्यात मांढळ व वेलतूर येथे प्रत्येकी चार रुग्णांची नोंद करण्यात आली. मांढळ प्रा.आ. केंद्रांतर्गत पारडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या शिबिरात २० रुग्णांची चाचणी करण्यात आली. यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. रचना नागदेवे व उपसरपंच नरेश शुक्ला यांनी दिली.

--

रामटेकमध्ये आठ रुग्णांची भर

रामटेक तालुक्यात गुरुवारी आठ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील भगतसिंग वॉर्ड येथे दोन तर ग्रामीण भागात शिवनी येथे पाच तर बेलदा येथे एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १०९८ इतकी झाली आहे. यातील ९८१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.