शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक्स मार्केट हल्ल्यातील आरोपींना पीसीआर

By admin | Updated: October 29, 2015 03:21 IST

सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांचा ....

नागपूर : सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ओ. एन. मंत्री यांच्या न्यायालयातून ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. किशोर प्रल्हाद कुळकर्णी ऊर्फ कुत्तरमारे(४५) रा. द्वारकापुरी, काश किशोर कुळकर्णी ऊर्फ कुत्तरमारे (२०), संजय ऊर्फ कटप्पा अमरनाथ पाल (२१) रा. भगवाननगर, कांचन दिनेश पाल (२५) रा. पार्वतीनगर, विवेक ऊर्फ विक्की वसंता मेश्राम (२१) रा. कुकडे ले-आऊट, शिवदत्त नरेश कनोजिया (१८) रा. पार्वतीनगर, अशी आरोपींची नावे आहेत. हल्ल्याची ही घटना २६ आॅक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली होती. तेलीपुरा मार्केटमधील देवगडे भवनमध्ये प्रशांत घनश्याम नानवाणी यांचे तिरुपती इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. या ठिकाणाहून २४ आॅक्टोबर रोजी किशोर कुत्तरमारे आणि त्याचा मुलगा काश कुत्तरमारे यांनी पेन ड्राईव्ह खरेदी केला होता. तो खराब निघाल्याने आरोपींनी दुकान मालकाला तो बदलवून मागितला असता मालकाने नकार दिला होता. त्यामुळे आरोपी रागात निघून गेले होते. रात्री ९ वाजता काश याने आपले साथीदार आणून या दुकानावर सशस्त्र हल्ला करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. घनश्याम नानवाणी यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना ३१ आॅक्टोबरपर्यंत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. विलास सेलोकर, अ‍ॅड. लुबेश मेश्राम, अ‍ॅड. जयश्री हेडाऊ यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)