शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’ च्या चौकशीसाठी पथक दाखल पीसीसीएफची घेतली भेट :

By admin | Updated: January 21, 2017 02:34 IST

उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहे. या पथकात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) बेंगळुरू येथील इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट (आयजी) पी. एस. सोमशेखर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सहसंचालक व देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थानचे वैज्ञानिक कमर कुरेशी यांचा समावेश आहे. माहिती सूत्रानुसार या पथकाने शुक्रवारी दुपारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. भगवान यांची भेट घेऊन त्यांच्याशी ‘जय’ च्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. शिवाय उद्या शनिवारी हे पथक उमरेड-कऱ्हांडला व तेथून नवेगाव-नागझिरा येथील दौरा करणार असल्याची माहिती आहे. पुढील २२ जानेवारीपर्यंत हे पथक ‘जय’ संबंधीच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची चौकशी करणार आहे. तसेच २३ जानेवारी रोजी नागपुरात परत येणार असून, सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर पथक आपला चौकशी अहवाल दिल्ली येथील एनटीसीएच्या मुख्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. विशेष म्हणजे, ‘जय’ हा मागील वर्षी १८ एप्रिलपासून अचानक गायब झाला असून, त्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. त्याचवेळी खासदार नाना पटोले यांनी ‘जय’ चा मुद्दा थेट संसदेत उपस्थित करू न, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्यावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी ‘जय’ च्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ही चौकशी समिती स्थापन केली असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)